ग्रेटा थुनबर्गचा टाइम 'पर्सन ऑफ द इयर' 2019 ने गौरव

ग्रेटा थनबर्ग

फोटो स्रोत, EPA

स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गला टाइम मॅगझीनने 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवले आहे. 1927 पासून पुरस्कार देण्याच्या परंपरेत ग्रेटा थुनबर्ग ही सर्वांत लहान व्यक्ती आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यावेळी नार्वेतील खासदार फ्रेडी आंद्रे ओस्टेग्राड म्हणाले, "जर हवामान बदल रोखण्यासाठी आपण काहीच केलं नाही तर त्यातून युद्ध, संघर्ष आणि निर्वासितांच्या समस्या उभ्या राहणार आहेत. ग्रेटाने यासाठी लोकचळवळ उभी केली. शांततेसाठी तिचं हे योगदान आहे."

ग्रेटा कोण आहे?

ग्रेएटाने ट्वीटवर स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ती असा करून दिला आहे. तिला अस्पर्जर सिंड्रोम हा आजार असल्याचंही तिनं म्हटलं आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी तिनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलनं केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.

ग्रेटा थनबर्ग

फोटो स्रोत, AFP

दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिने हवामान बदलावर तिची भूमिका मांडली आहे. हवामान बदलासमोर आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावं लागेल, असं ती म्हणाली होती. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.

ग्रेएटाच्या आंदोलनाला Fridays For The Future असं नावं मिळालं असून हे आंदोलन विविध देशांत पोहोचलं आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलनं झाली आहेत. शुक्रवारी जवळपास 100 देशांत हे आंदोलन झालं.

कसा सुरू झाला हा प्रवास?

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ग्रेटा सांगते, "मी लहान असताना माझे भरपूर प्लॅन्स होते. अभिनय करण्यापासून ते शास्त्रज्ञ होण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा मी विचार करत होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"नंतर एकदा शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला हवामान बदलाविषयी सांगितलं आणि माझे डोळे उघडले. त्याबद्दल मी जितकं वाचत गेले तितकं हे सर्वांसाठीच किती भयंकर आहे हे माझ्या लक्षात आलं."

या सगळ्याने व्यथित झालेल्या ग्रेटाने शाळेत जाणं सोडलं, लोकांशी बोलणंही सोडलं.

ग्रेटा थुनबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

मग एक दिवस 'आता बस्स!' असं तिने ठरवून टाकलं. हा तिच्यासोबतच इतरांच्याही भविष्याचा प्रश्न होता. तिला वाटलं की बाकी कोणी याविषयी काही करत नसेल तर मग आता तिला स्वतःलाच याविषयी काहीतरी करायला हवं. म्हणून मग शाळेत न जाता तिने स्वीडनच्या संसदेबाहेर हातात फलक घेऊन आंदोलन करायला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी ती एकटीच होती. पण दुसऱ्या दिवसापासून तिला लोकांची साथ मिळाली.

खरंतर असं काही घडेल आणि इतक्या पटकन घडेल याची ग्रेटाला अपेक्षाच नव्हती. ग्रेटाचा कित्ता जगभरातल्या लाखो मुलांनी गिरवला.

'भविष्यच धोक्यात आहे तर शाळेत जाऊन काय उपयोग?'

ग्रेटाचा प्रश्न सरळसाधा आहे, "जर आमचं भविष्यच धोक्यात असेल तर शाळेत कशाला जायचं? जर मोठी माणसं सगळ्यात महत्त्वाच्या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणार असतील तर आम्ही इतर गोष्टी कशाला शिकायच्या?"

पोलंडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक परिषदेमधलं तिचं भाषणही धोरणकर्त्यांना विचार करायला लावणारं होतं. "माझ्या असं लक्षात आलं, की आम्ही वयाने लहान असलो तरी बदल घडवता येतात. जगभरातली काही मुलं शाळेत न जाता याविषयाकडे जगाचं लक्ष वेधून घेऊ शकतात, जगभरातल्या बातम्या या घटनेच्या हेडलाईन देऊ शकतात, तर विचार करा, की जर आपण खरंच एकत्र काम करायचं ठरवलं, तर काय काय साध्य करता येईल."

नोबेलसाठी शिफारस

हवामान बदलाबद्दल जागृती घडवणाऱ्या ग्रेटाच्या नावाची शिफारस शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

जगभरामध्ये शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा प्रसिद्ध पुरस्कार दिला जातो.

ग्रेटा थुनबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी मलाला युसुफजाई, कैलाश सत्यार्थी, महंम्मद युनुस, नेल्सन मंडेला आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.

नोबेलसाठी शिफारस होणं हा आपला बहुमान असल्याचं ग्रेटाने म्हटलंय.

या पुरस्कारासाठी एकूण 301 लोकांची आणि संस्थांची शिफारस करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांची घोषणा होईल.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)