You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेसबुकवर प्रश्न मंजुषेच्या नावाखाली लोकांच्या प्रोफाईल डेटाची चोरी
फेसबुकवर प्रश्न मंजुषेच्या नावाखाली हजारो लोकाचा प्रोफाईल डेटा चोरी करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे, असं खुद्द फेसबुकनेच सांगितलं आहे.
प्रश्न मंजुषेत भाग घेण्यासाठी फेसबुक युजर्सला browser extensionsची विनंती करण्यात येत होती. त्यानंतर त्यांचं नाव, फोटो, फ्रेंड लिस्टची माहिती गोळा करण्यात येत होती.
2016 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत 63 हजार वेळा असं झाल्याचं, फेसबुकने सांगितलं आहे.
युक्रेनच्या अँड्रे गोर्बाचेव्ह आणि ग्लेब स्लचेव्हस्की यांना फेसबुकने कोर्टात खेचलं आहे. ते दोघजण Web Sun Group साठी काम करत होते.
"तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्याविषयी काय सांगतो?" लोक तुमच्या सुंदरतेवर प्रेम करतात की तुमच्या बुद्धीमत्तेवर? अशा मथळ्याखाली या प्रश्न मंजुषा होत्या. त्यात सहभाग घेतला की फेसबुकद्वारे तिसऱ्या अॅपवर लॉगिन केलं जायचं.
असं करण पूर्णपणे सुरक्षित होतं पण चुकीच्या मथळ्याखाली लोकांच्या माहितीची चोरी केली जायची. अशा प्रश्न मंजुषेमुळे 63 हजार ब्राऊजर्समधून माहिती गोळा करण्यात आली आहे. या प्रकारामुळे फेसबुकला 75 हजार डॉलर्सचं नुकसान झालं आहे, असं कंपनीनं कोर्टात सांगितलं.
त्या दोघा जणांनी अमेरिकेच्या काँप्युटर हॅकिंगविरोधी कायद्याचं आणि फेसबुकच्या अटी-नियमांचं उल्लंघन केल आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
बीबीसी Web Sun Group कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतल्या सायबर सुरक्षा तज्ज्ञ अँड्रु डायर सांगतात की, "कंपनीनं कोर्टात दिलेल्या कागदपत्रात दिलेल्या माहितीनुसार ते browser extensions ज्या युजरने install केलं त्यांनंतर त्यांच्या फेसबुक खात्यात सरळ प्रवेश करण्यात आला."
फेसबुकची सध्याची व्हेरिफिकेशन प्रक्रिया अशा संशयित घडामोडी रोखण्यात अपयशी ठरली आहे, असं डायर सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)