अमेरिकन खासदाराचा गंभीर आरोप, वायुसेनेत असताना बलात्कार झाला

एअरफोर्समध्ये असताना माझ्यावर माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बलात्कार केला होता असं विधान अमेरिकेच्या खासदार मार्था मॅकसॅल्ली यांनी केलं आहे.
मॅकसॅल्ली या अमेरिकेच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक आहेत. सैन्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सुनावणी सुरू होती त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.
माझ्यावर बलात्कार झाल्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटली, ही गोष्ट मी कुणाला सांगितली नाही. लैंगिक अत्याचार झालेल्यापैंकी अनेकजणांनी हिंमत दाखवली आणि त्यांनी तक्रार केली पण मी तसं केलं नव्हतं तर मी स्वतःलाच दोषी मानलं. माझ्या मनात संभ्रम होता. असं त्या म्हणाल्या.
2017मध्ये लष्करात अंदाजे 6800 लैंगिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली होती. ही संख्या त्याच्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे. सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस सबकमिटीची सुनावणी होती त्यावेळी मॅकसॅल्ली यांनी हे विधान केले. यावेळी लैंगिक अत्याचार पीडित हजर होते.
तुमच्याप्रमाणेच मी देखील लैंगिक अत्याचाराची बळी आहे. पण तुमच्यासारखी हिंमत मी दाखवली नाही. अनेक स्त्री-पुरुषांचा व्यवस्थेवर विश्वास असतो तसा माझा व्यवस्थेवर त्यावेळी विश्वास नव्हता.
मी स्वतःला दोषी ठरवलं. मला माझीच लाज वाटत होती मी संभ्रमात होते. गुन्हेगारांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत. माझ्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्यावर बलात्कार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
काही वर्षानंतर मी अधिकाऱ्यांना जाऊन ही घटना सांगितली पण त्यांनी पुढील कारवाई केली नाही.
त्यानंतर मी18 वर्षं सेवा केली आणि नैराश्यातून एअरफोर्स सोडली. मला असं वाटत होती व्यवस्थाच माझ्यावर वारंवार बलात्कार करत आहे.
मॅकसॅल्ली यांच्या वक्तव्यानंतर खासदार क्रिस्टन गिलिबोर्ड म्हणाल्या की त्यांच्या विधानाने मी खूप व्यथित झाले आहे.
मॅकसॅल्ली यांनी 26 वर्षं एअरफोर्समध्ये सेवा केली. सेवानिवृत्ती वेळी त्या कर्नल होत्या. नंतर त्या दोनदा हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हमध्ये निवडून गेल्या. आता त्या सिनेटर आहेत.
आपण लैंगिक अत्याचाराच्या पीडिता आहोत ही बाब त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेली नाही. गेल्या वर्षी सिनेटच्या निवडणुकीवेळी त्यांनी सांगितलं होतं की त्या 17 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या कोचनं त्यांना शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं.
जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या एक सिनेटर जोनी एर्न्स्ट यांनी म्हटलं होतं की कॉलेजमध्ये असताना त्यांच्या बॉयफ्रेंडनं त्यांच्यावर लैंगिक हल्ला केला होता. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली नव्हती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








