पाकिस्तानने ताब्यात घेतलेला मसूद अझरचा भाऊ हम्माद अझर कोण आहे?

मसूद अझर

फोटो स्रोत, AFP

    • Author, अम्माद खालिक
    • Role, बीबीसी उर्दू सेवा

जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या संघटनेविरोधात कारवाई करत पाकिस्तान सरकारने या संघनेसंबंधीत 44 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

यामध्ये मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रऊफ आणि हम्माद अझर यांच्यासारख्या लोकांचा समावेश आहे.

भारत सरकारने पाकिस्तानला पुलवामा घटनेसंदर्भात एक डोसियर सोपवलं आहे. त्याच्याआधारे पाकिस्तानने ही कारवाई केल्याचं भारत आणि पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

अटक झालेल्या लोकांपैकी अनेकांची नावे या डोसियरमध्ये समाविष्ट आहेत असं पाकिस्तानचे गृहराज्य मंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनी स्पष्ट केले आहे.

पण अटक झालेले लोक जैश-ए-मोहम्मदमध्ये काय जबाबदारी पार पाडत होते याबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत.

हम्माद अझर कोण आहे?

युद्धनीतीततज्ज्ञ आमिर राणा सांगतात, "हम्माद अझर आणि मुख्ती अब्दुर रऊफ हे दोघे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचे भाऊ आहेत.

जैश-ए-मोहम्मदचे नव्याने उदयाला येणारे नेते म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. हे दोघेही दक्षिण पंजाबमधील बहावलपूरचे रहिवासी आहेत. "

मसूद अझर

फोटो स्रोत, AFP

'मौलाना मसूद अझरला चार भाऊ असल्याचे' पत्रकार सूबुख सय्यद यांनी बीबीसीला सांगितले. सूबुख यांचा धार्मिक आणि सैन्य संस्थांचा अभ्यास आहे.

मौलाना इब्राहिम सर्वात मोठा, त्यानंतर मुफ्ती अब्दुर रऊफ असगर, तिसऱ्या क्रमांकावर खुद्द मसूद अझर आणि हम्माद अझर सर्वात लहान भाऊ आहे.

सुरूवातीच्या काळामध्ये मुफ्ती अब्दुर रऊफ आणि हम्माद अझर यांची संघटनेत फारशी मोठी भूमिका नव्हती. पण मसूद अझर तुरुंगात गेल्यावर त्यांनी संघटनेत काम सुरू केलं होतं.

पत्रकार सय्यद म्हणतात, "हम्माद अझरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे आर्थिक घडामोडींची जबाबदारी होती. तर संघटनेच्या कामाची जबाबदारी मुफ्ती रऊफ असगरकडे देण्यात आली होती. या दोन्ही भावांनी जैश-ए-मोहम्मदच्या कराची आणि मुजफ्फराबाद येथील मेळाव्यांचं आयोजन केलं होतं."

भारताच्या डोसियरमध्ये या लोकांचं नाव समाविष्ट होण्याबाबत आमिर राणा सांगतात, "याचं कारण हे दोन भाऊ बालाकोटमध्ये असणारा मदरसा चालवत होते असं भारताला वाटतं होतं. या मदरशावर भारतानं गेल्या आठवड्यात हवाई हल्ल केला होता. पुलवामा हल्ल्याला हे दोघे जबाबदार असल्याचा दावा केला जात आहे."

भारताचे आरोप कितपत खरे आहेत याचा निर्णय पाकिस्तानने डोसियवर अधिकृत उत्तर दिल्यावरच समजले. "डोसियरमध्ये दिलेली नावं आणि इतर माहितीच्या सत्यतेबाबत पाकिस्तानने अजून काहीही स्पष्टीकरण दिलेलं नसल्याचं", आमिर राणा सांगतात.

यापूर्वीही भारताने बंदी घातलेल्या अशा संघटनांना लगाम घालण्याचा मुद्दा भारताने उचलला असल्याचं राणा सांगतात. माक्र एखाद्या कट्टरवादी हल्ल्यामध्ये हम्माद अझरचं पहिल्यांदाच नाव आलं आहे. मात्र मुफ्ती अब्दुर रऊफचं नाव पुलवामाच्या आधी उरी हल्ल्यातही नाव आलं होतं.

मसूद अझर आणि त्याच्या कुटुंबीयाचं नाव भारत सरकार आणि भारतीय माध्यमं अनेकदा घेत असतात. या प्रकरणातही तसंच काहीसं असल्यासारखं वाटतं.

सुबूख सय्यद सांगतात, "हम्माद अझर आणि मुफ्ती अब्दुर रऊफ यांची नावं जैश-ए-मोहम्मदचे महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून माध्यमांमध्ये येत राहिली. मात्र एखाद्या कट्टरवादी हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याचं माध्यमांमध्ये कधीही उघडपणे आलेलं नाही". मात्र सय्यद यांच्या मतानुसार हे दोन्ही भाऊ जैश-ए-मोहम्मद संघटनेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)