राजकुमारीने पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणं चुकीचं: थायलंडचे राजे बहिणीवर रुसले

राजकुमारी उबोलरत्ना

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, राजकुमारी उबोलरत्ना

थायलंडच्या राजकुमारी उबोलरत्ना माहिदोल यांनी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणं अनुचित आहे, असं मत त्यांचे बंधू आणि थायलंडचे राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांनी व्यक्त केलं आहे.

मार्च महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी 67 वर्षांच्या राजकुमारी उबोलरत्ना यांना माजी पंतप्रधान थकसीन चिनावट यांच्या सहयोगी पक्षाने उमेदवारी दिली आहे.

राजकुमारीच्या या निर्णयामुळे थायलंडच्या राजघराण्यातील सदस्यांनी राजकारणातून दूर राहण्याच्या परंपरेला छेद दिला जाईल. त्यांचा पंतप्रधानपदासाठीचा दावा हा देशाच्या संस्कृतीच्या विरोधात असेल, असं राजघराण्याच्या एका निवेदनात राजे वाजिरालाँगकॉर्न यांनी म्हटलं आहे.

विश्लेषकांच्या मते राजाच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक आयोग 24 मार्चला होणाऱ्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत राजकुमारींना अयोग्य घोषित करू शकतं.

पाच वर्ष लष्करी राजवटीनंतर थायलंडमध्ये लोकशाही पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष आहे.

राजघराण्याने जारी केलेलं हे निवेदन थायलंडच्या सर्व वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आलं. यात राजे म्हणतात, "राजकुमारीने जरी आपल्या शाही पदव्यांचा त्याग केला आहे, तरी त्या चक्री वंशाच्या सदस्य आहेत. शाही परिवाराच्या कोणत्याही सदस्याने राजकारणात येणं म्हणजे देशाच्या परंपरेच्या आणि संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे असं करणं अतिशय अयोग्य ठरेल."

या निवेदनात थायलंडच्या राज्यघटनेचा दाखला देण्यात आला आहे, ज्यानुसार राजघराण्याने देशाच्या राजकारणापासून दूर रहायला हवं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या निवेदनाच्या काही तासातच राजकुमारी उबोलरत्ना माहिदोल यांनी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं. आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या अधिकारांचा वापर करू इच्छितो, असं त्या म्हणाल्या.

"मी प्रामाणिकतेने आणि चिकाटीने थायलंडच्या लोकांची सेवा करेन," असंही त्या यावेळी म्हणाल्या.

कोण आहेत राजकुमारी उबोलरत्ना?

उबोलरत्ना थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल यांची सगळी मोठी मुलगी आहे. राजा भूमिबोल यांचं 2016 मध्ये निधन झालं होतं.

1951 मध्ये जन्म झालेल्या उबोलरत्ना यांनी मॅसेच्युसेटास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर 1972 मध्ये एका अमेरिकन व्यक्तीशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजघराण्यातील आपल्या पदांचा त्याग केला होता.

राजा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, थायलंडच्या राजाने आपल्या बहिणीची निर्भत्सना केली आहे.

पण त्यांच्या घटस्फोटानंतर 2001 मध्ये त्या थायलंडमध्ये परतल्या आणि राजघराण्यातल्या कारभारात पुन्हा लक्ष देऊ लागल्या.

राजकुमारी उबोलरत्ना या सोशल मीडियावर अतिशय सक्रिय आहेत आणि त्यांनी थायलंडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची तीन मुलं आहेत. पण त्यापैकी एका मुलीचा 2004च्या त्सुनामीमध्ये मृत्यू झाला होता. इतर दोघं मुलं थायलंडमध्येच राहतात.

माजी पंतप्रधान थकसीन चिनावट यांच्या नजीकचा पक्ष मानल्या जाणाऱ्या थाय रक्षा चार्ट पक्षाच्या त्या अधिकृत सदस्य आहेत.

ही निवडणूक का महत्त्वाची आहे?

2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्या लोकशाहीवादी सरकारला उलथवून सध्याचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा हे सत्तेवर आले होते. शिनावात्रा या थकसीन यांच्या लहान बहीण आहेत.

तेव्हापासून थकसीन आणि त्यांची बहीण विजनवासात राहत आहेत, पण तरी थायलंडच्या राजकारणात त्यांचं आजही मोठं महत्त्व आहे आणि देशातील अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे.

थायलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थायलंडचे विद्यमान पंतप्रधान प्रयुथ छान ओचा

2016 मध्ये थायलंडच्या जनतेने लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या एका नव्या राज्यघटनेला मान्यता दिली. सैन्याचा राज्यकारभारात वरचष्मा असेल, अशी तरतूद या नव्या राज्यघटनेत करण्यात आली होती. थकसीन किंवा त्यांच्या कुठलेही विश्वासू नेते थायलंडमध्ये निवडणूक जिंकू शकणार नाही, यासाठी ही तरतूद करण्यात आली होती.

पण आता राजाच्या बहिणीनेच थेट थकसीन यांना समर्थन दिल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातच प्रयुथ चान-ओचा यांनीही या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ते लष्करी राजवटीच्या बाजूने असलेल्या पलांग प्रचारत पक्षातून निवडणूक लढवतील.

थायलंडमध्ये राजघराण्याविरोधात बोलण्यावर, त्यांच्यावर टीका करण्यावर कठोर दंडाची कायद्याने तरतूद आहे.

तसं पाहिलं तर राजकुमारी उबोलरत्ना या कायद्याच्या चौकटीत बसत नाही. राजघराण्याला देशात एवढा सन्मान आहे की साधारणत: त्यांच्यावर कुणीही टीका करत नाही.

पण आता राजघराण्यातील व्यक्तीच थेट राजकारणात येणार म्हटल्यावर, त्यांना कोण आव्हान देतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)