अमेरिका अंटार्क्टिकापेक्षाही थंड: Polar vortex मुळे 8 जणांचा बळी

गिर्यारोहक

फोटो स्रोत, DAVE GIACOMIN

USमध्ये कडाक्याच्या थंडीनं 8 जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकन नागरिक अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत.

लोवा विद्यापाठातील एका विद्यार्थ्याच्या या थंडीमुळे मृत्यू झाला आहे.

वेगवेळ्या दवाखान्यांमध्ये हिमबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.

गुरुवारी थंडीची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. USमधील जवळपास 9 कोटी लोक -17C तापमान अनुभवत आहेत.

जवळपास 25 कोटी लोकांनी polar vortex चा अनुभव घेतला आहे. पण फ्लोरिडा या राज्याची यापासून सुटका झाली आहे.

काय घडलं?

  • University of Iowac मधील विद्यार्थी गेराल्ड बेल्झ (18) कॅम्पसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळला, नंतर त्याचा दवाखान्यात मृत्यू झाला. बिघडलेलं हवामान याला कारणीभूत आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
  • मिशिगनमधल्या एका 70 वर्षीय व्यक्ती घराशेजारी मृतावस्थेत आढळून आली. त्यानं पुरेशा प्रमाणात कपडे घातले नव्हते, असं अधिकाऱ्य़ांनी सांगितलं.
व्हीडिओ कॅप्शन, Polar vortex : अमेरिकेतली शहरं अंटार्क्टिकाहून जास्त गोठली
  • याशेजारीच एक माणूस मृतावस्थेत आढळला. त्याचं संपूर्ण शरीर गोठलं होतं.
  • बर्फवृष्टीमुळे विस्कॉन्सिन इथल्या एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
  • hypothermia मुळे एका 82 वर्षीय व्यक्तीचा इलॉनिस येथे घराबाहेर मृत्यू झाला.
  • बर्फाच्छादित प्रदेशात एका तरुण जोडप्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

हवामान कसं आहे?

गुरुवारी अमेरिकेतल्या तिसऱ्या सर्वांत मोठ्या शहरात -32C तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. बोस्टन शहरातही ही लाट पोहोचण्याची शक्यता आहे.

गुरुवारी रात्रीपर्यंत Great Lakesचा परिसर गोठण्याची शक्यता आहे.

बर्फवृष्टी

फोटो स्रोत, VILLAGE OF RICHFIELD

न्यूयॉर्कला प्रचंड बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. प्रतितास 7cm-12cm एवढ्या वेगानं बर्फ पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम आणि Great Lake भागात -40C आणि -53C हवामानाची नोंद झाली आहे. या तापमानात फक्त 5 मिनिटांत हिमबाधा होऊ शकते.

जवळपास 60 डिग्रीनं शिकागोच्या तापमानात बदल होणार आहे, असं National Weather Serviceच्या डेव्हिड हॅमरिक यांनी रॉयटर्सला सांगितलं आहे.

याशिवाय कॅनडाच्या Prairies, Quebec and Ontario to heavy snows in Alberta and Nova Scotia कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामानाचा रोजच्या जीवनावर परिणाम?

या हवामानामुळे लोकांची लूट केली जात आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. स्थानिक माध्यमांनुसार, 78,340 रुपयांचं Canada Goose जॅकेट घातलेल्या लोकांना टार्गेट करण्यात आलं आहे.

याशिवाय Hamilton या संगीत कार्यक्रमाचे तिकीट 4,500 रुपयांना म्हणजेच नेहमीच्या दरापेक्षा निम्म्या दरानं विकले जात आहेत.

बर्फवृष्टी

फोटो स्रोत, THE WASHINGTON POST VIA GETTY IMAGES

तसंच गेल्या 85 वर्षांच्या इतिहासात बुधवारी आणि गुरुवारी असं चौथ्यांदा शहरातील Brookfield Zoo बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय मंगळवारी USमध्ये येणाऱ्या अथवा बाहेर पडणाऱ्या 1,100हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच हजारो शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.

"अनेक पिढ्यांनंतर आलेला हा अनुभव आहे," असं मिल्वाकी शहराचे महापौर टॉम बॅरेट यांनी म्हटलं आहे.

USच्या अनेक शहरांत आश्रयगृह स्थापन करण्यात आले आहेत.

"बाहेर पडण्यासाठी कोणताही रात्र योग्य नाही," असं बॅरेट यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)