प्लास्टिकचं जाळं जलचरांच्या जीवावर उठलं

जाळ्यात अडकलेला कासव

फोटो स्रोत, JORDI CHIAS / NATIONAL GEOGRAPHIC

फोटो कॅप्शन, जाळ्यात अडकलेला कासव

वापर केल्यानंतर फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे जगभरातील समुद्र आणि नद्यांमध्ये राहणाऱ्या जलचरांसाठी एक मोठा धोका निर्माण झाला आहे. नॅशनल जिओग्राफिकल मॅगझीनने आपल्या जूनच्या अंकात ही वैश्विक समस्या छायाचित्रांच्या माध्यमातून जगासमोर आणली आहे.

जलचर कधी प्लास्टिकमध्ये गुरफटले जातात तर कधीकधी ते प्लास्टिकच गिळून टाकतात. स्पेनमध्ये एका कचऱ्याच्या ढिगावर बसलेला हा सारस पक्षी प्लास्टिक बॅगमध्ये गुरफटला गेला. त्याचं नशीब जोरावर होतं म्हणून तो वाचला. फोटोग्राफरने त्याच्या शरीराभोवती गुंडाळली गेलेली बॅग वेगळी केली. प्लास्टिक बॅग अनेकांचा जीव घेऊ शकते. कारण त्यात फसलेला जीव मृत्यूनंतर विघटीत होईल पण प्लास्टिक बॅग तशीच राहिल.

प्लास्टिक प्रदूषणाला सामोरा जाणारा सारस पक्षी

फोटो स्रोत, NATIONAL GEOGRAPHIC

फोटो कॅप्शन, प्लास्टिक प्रदूषणाला सामोरा जाणारा सारस पक्षी

पहिल्या फोटोतलं कासव बघा. मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलं आहे. कुणीतरी वापरून खराब झालेलं हे जाळं समुद्रात फेकून दिलं असेल. मोठ्या मुश्किलीनं पाण्याबाहेर डोकं काढल्यानंतर कासवाला श्वास घेता येत होता. कासवाला त्या जाळ्यातून सोडायचा प्रयत्न करताना भीतीमुळे कासवाने प्राण सोडून नये एवढ्याच विचाराने फोटोग्राफरने त्याची सुटका केली नाही.

जाळ्यात अडकलेला कासव

फोटो स्रोत, JORDI CHIAS / NATIONAL GEOGRAPHIC

फोटो कॅप्शन, जाळ्यात अडकलेला कासव

जपानच्या ओकिनावा इथं हा खेकडा शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी या प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणात घुसला. नंतर तिथंच अडकून पडला. समुद्र किनाऱ्यावर शिंपले गोळा करण्यासाठी येणाऱ्यांकडून अशा वस्तू किनाऱ्यावरच टाकून दिल्या जातात. हाच कचरा खेकड्यांसाठी जीवघेणा ठरतोय.

ओकिनावाच्या किनाऱ्यावर अडकलेला हा खेकडा

फोटो स्रोत, SHAWNMILLER2014

फोटो कॅप्शन, ओकिनावाच्या किनाऱ्यावर अडकलेला हा खेकडा

भूपृष्ठावर आपण जे प्लास्टिक प्रदूषण बघतो त्यापेक्षा कैक पटीने प्लास्टिक प्रदूषण हे समुद्रात असतं. प्लास्टिक कचऱ्याचे लहान-लहान तुकडे केले जाऊ शकतात. पण त्यानंतरही ते जल जीवनावर परिणाम करताना दिसतातच.

नॅशनल जिओग्राफिकलचा जूनचा अंक

फोटो स्रोत, NATIONAL GEOGRAPHIC

फोटो कॅप्शन, नॅशनल जिओग्राफिकलचा जूनचा अंक

इथोपियामधील या तरसांनी कदाचित स्वतःला प्लास्टिक प्रदूषण असलेल्या वातावरणाशी जुळवून घेत जीवन जगण्याची कला अवगत केली असावी. डंपिंग ग्राउंडवर जेव्हा कधी एखादा ट्रक कचरा टाकून जातो, तेव्हा तरस या कचऱ्यातून आपलं अन्न शोधण्यात गुंतून जातात.

इथोपियामधील हे तडस

फोटो स्रोत, BRIAN LEHMANN / NATIONAL GEOGRAPHIC

फोटो कॅप्शन, इथोपियामधील तरस

ढाका इथं बुरीगंगा नदीत प्लास्टिकच्या पिशव्या धुतल्या जातात. अशाच एका ढिगावर बसलेली ही महिला आपल्या मुलाच्या मदतीनं पिशव्या धुते. यानंतर प्लास्टिक बॅग रिसायकलकरिता पाठवण्यात येतात.

जगात अस्तित्वात असलेल्या एकूण प्लास्टिकचा पाचव्या भागापेक्षाही कमी प्लास्टिक हे रिसायकलिंगकरिता पाठविलं जातं. अमेरिकेत तर फक्त 10 टक्केच प्लास्टिकचं रिसायकलिंग केलं जातं.

ढाका इथलं हे चित्र

फोटो स्रोत, RANDY OLSON

फोटो कॅप्शन, ढाका इथलं हे चित्र

हे छायाचित्र तर तुम्ही या आधीही बघितलं असेलच. अवघ्या जगाला हादरून टाकणारं हे छायाचित्र इंडोनेशियातील एका बेटाच्या परिसरात घेण्यात आलं. कॉटन बग ओढून घेऊन जाणारा हा सीहॉर्स. फोटोग्राफर हॉफमॅन म्हणतात, "हे एक असं छायाचित्र आहे, जे खरं तर अस्तित्वात असायला नको होतं."

कॉटन बग ओढून घेऊन जाणारा हा सीहॉर्स.

फोटो स्रोत, JUSTIN HOFMAN

फोटो कॅप्शन, कॉटन बग ओढून घेऊन जाणारा हा सीहॉर्स.

प्लास्टिक बाटल्यांनी गच्च भरलेला माद्रिदमधला थीबेलेस फाउंटन. लुजिन ट्रप्टस नावाच्या एका कलाकाराने माद्रिदमधील या फाउंटनसह दुसरी आणखी दोन फाऊंटन तब्बल 60 हजार बाटल्यांनी भरून टाकली. लोकांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं.

माद्रिदमधील हे दृष्य.

फोटो स्रोत, NATIONAL GEOGRAPHIC

फोटो कॅप्शन, माद्रिदमधील हे दृष्य.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)