'उत्तर कोरिया पूर्णपणे अण्वस्त्र नष्ट करणार नाही' : गुप्तहेर संस्थांचा अहवाल

किम जाँग-उन

फोटो स्रोत, Reuters

उत्तर कोरिया पूर्णपणे अण्वस्त्रांचा त्याग करण्याची शक्यता कमी आहे, असा अहवाल अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने दिला आहे.

The Worldwide Threat Assessment reportने दिलेल्या माहितीत इराण अण्वस्त्र बनवत नाही, पण रशिया आणि चीनकडून सायबर धोके वाढले आहेत, असंही म्हटलं आहे.

डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटिलिजन्सनं The Worldwide Threat Assessment report सादर केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तहेर विभागाचे संचालक डॅन कोट्स आणि गुप्तचर विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी हा अहवाल सिनेटला मंगळवारी सादर केला.

अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय सवलती मिळवण्यासाठी अशंतः अण्वस्त्र निशस्त्रीकरणासाठी पावलं उचलत आहे. पण उत्तर कोरिया त्याच्याकडील अण्वस्त्रांचे साठे आणि अण्वस्त्र निर्माण करण्याचं तंत्रज्ञान सोडून देण्याची शक्यता नाही, असं या अहवालात म्हटलं आहे.

डॅन कोट्स

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डॅन कोट्स

उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची जून महिन्यात सिंगापूरमध्ये भेट झाली होती. यात अण्वस्त्र निशस्त्रीकरणावर चर्चा झाली पण यात फारशी प्रगती झालेली नाही.

या अहवालात रशिया आणि चीनकडून असलेल्या धोक्यांवर सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. 1950नंतर दोन्ही देश प्रथमच इतके जवळ आले असल्याचं यात म्हटलं आहे. दोन्ही देशांनी इंटरनेट तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असून 2020च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ते प्रभाव पाडू शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे.

इराण सध्या अण्वस्त्र बनवत नाही, पण इराणच्या प्रादेशिक अस्मिता आणि सामरिक क्षमता यांचा भविष्यात अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका पोहचू शकतो, असं या अहवालात म्हटलं आहे.

ट्रंप

फोटो स्रोत, AFP

अमेरिकेने सध्या इराणवर निर्बंध लादले आहेत. तर सिनेटमध्ये झालेल्या सुनावणीत CIAचे संचालक जीना हास्पेल यांनी तांत्रिकदृष्ट्या इराण 2015च्या अण्वस्त्र कराराचं पालन करत असल्याचं म्हटलं होतं. तर मध्य-पूर्वेत कथित इस्लामिक स्टेटचा पूर्ण पाडाव झालेला नाही, असं या अहवालात म्हटलं आहे. इस्लामिक स्टेट सामाजिक अस्थैर्य, सुन्नी पंथीयांचा भावना आदींच्या मदतीने इराक आणि सीरियात भूभाग ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न करेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

पण अमेरिकेचे काळजीवाहू संरक्षणमंत्री पॅट्रिक शानहान यांनी इस्लामिक स्टेट त्याच्या ताब्यातील भूभाग गमावत आहे, असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)