औषध म्हणून गांजा सुचवल्यामुळे डॉक्टरांचा परवाना निलंबित

कॅलिफोर्नियासहित US मधल्या 33 राज्यांत वैद्यकीय कारणांसाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे.
फोटो कॅप्शन, कॅलिफोर्नियासहित US मधल्या 33 राज्यांत वैद्यकीय कारणांसाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे.

एका चार वर्षीय मुलाला गांजा औषध म्हणून सांगितल्यामुळे कॅलिफोर्नियातील एक डॉक्टर सध्या परवाना परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

"लहान मुलांच्या क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी गांजाचे लहान लहान डोस मदत करू शकतात," असं डॉ. विलियम ईडलमन सांगतात.

Bipolar disorder असलेल्या मुलाचं डॉक्टरांनी 'चुकीच्या' पद्धतीनं निदान केलं.

यामुळे The Medical Board of Californiaनं डॉक्टरांचा परवाना निलंबित केला आहे. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

"मुलाला औषध म्हणून गांजा सुचवल्याबद्दल बोर्डानं डॉक्टरांचा परवाना रद्द केलेला नाही, तर त्यांनी पेशंटची काळजी आणि उपचार यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि मानसशास्त्रज्ञांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला न दिल्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला आहे," असं बोर्डानं म्हटलं आहे.

मूल शाळेत गैरवर्तणूक करत असल्यामुळे संबंधित पालकानं सप्टेंबर 2012मध्ये डॉ. विलियम यांच्याकडे उपचार सुरू केले.

डॉक्टरांनी औषधांचा थोड्या-थोड्या प्रमाणात वापर करण्यास सुचवलं होतं. पण या औषधात गांजा आहे, असं त्यावेळी लक्षात आलं जेव्हा दुपारच्या जेवणावेळी शाळेतील कर्मचाऱ्यानं या मुलाचा डबा पाहिला.

लहान असताना मुलाच्या वडिलांनाही bipolar disorder (वर्तनात अचानक होणारा बदल)चा त्रास होता. तसंच औषधांचाही त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत होता.

नंतर त्यांनी गांजा घ्यायला सुरुवात केली. "यामुळे मी शांत झालो आणि पत्नीसोबतच्या माझ्या वर्तनात बदल झाला. तसंच पूर्वी ज्यांच्याबद्दल मी राग व्यक्त केला होता त्यांच्याविषयीच्या वर्तनातही बदल झाला," असं ते सांगतात.

सकारात्मक परिणाम

यापूर्वी संबंधित पालकानं मोठ्या मुलासाठी औषधं आणली होती. याही मुलाला bipolar disorderचा त्रास होता.

"गांजामुळे माझ्या दोन्ही मुलांमध्ये सकारात्मक परिणाम झाला," असे ते म्हणतात.

गांजा

फोटो स्रोत, PRESS ASSOCIATION

4 जानेवारीला डॉ. विलियम यांचा परवाना रद्द करण्यात आला. यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. "परवाना रद्द केला तरी मी प्रॅक्टिस सुरू ठेवेन," असं त्यांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी न्यायालयात सुनावणी बाकी आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

1996पासून कॅलिफोर्नियात वैद्यकीय उपचारासाठी गांजा वापरण्याची मुभा आहे.

"आजपर्यंत मी अशी औषधं हजारहून अधिक लोकांना सुचवली आहेत, "असं डॉ. विलियम सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)