तुमच्या वार्षिक उत्पन्नाइतका पगार तुमचे बॉस केवळ एका दिवसात कसा कमावतात?

अॅपचे सीईओ टीम कूक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, टिम कूक

दरवर्षी आपण पगारवाढ होण्याची वाट पाहत असतो.

पण समजा जर तुम्ही यूकेमध्ये राहात असला तर बहुतेक तुमच्या बॉसने तुम्ही वर्षभरात जेवढे पैसे कमावता, तेवढा पैसा आतापर्यंत मिळवलाही असेल.

4 जानेवारीपर्यंत यूकेच्या मोठ्या कंपन्यांच्या सीईओंनी त्यांच्या कंपनीच्या एका साधारण कर्मचाऱ्याला जे पैसे कमावण्यासाठी एक वर्ष लागतं तितके पैसे मिळवले आहेत.

पण फक्त ब्रिटिश सीईओच इतक्या वेगाने पैसै मिळवतात असं नाही.

Bloomberg या संस्थेने 22 देशांतील सीईओ आणि कर्मचारी यांच्या पगारातील तफावत यांचा अभ्यास केला आहे. यात अमेरिका आणि भारतातील सीईओ जास्त गतीने पगार मिळवतात असं दिसून आलं आहे.

The Global CEO Indexने केलेल्या विश्लेषणात सीईओ एखाद्या कर्मचाऱ्याच्या वर्षिक वेतनाच्या तुलनेत किती उत्पन्न मिळवतात, याची तुलना केली आहे.

या विश्लेषणावरून दिसून येतं की अमेरिकेत उच्चपदावर काम करणारे सीईओ एखाद्या कर्मचाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नाइतका पैसा मिळवण्यासाठी त्यांना फक्त 1.52 दिवस लागतात.

स्टीव्ह इस्टब्रूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, McDonaldचे सीईओ स्टीव्ह इस्टब्रूक यांनी 2017मध्ये 21.7 दशलक्ष डॉलर इतकं उत्पन्न मिळवलं आहे.

तर भारतात हा वेळ आणखी कमी आहे. भारतात एखाद्या कर्मचाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नाइतका पगार मिळवण्यासाठी एखाद्या सीईओला एक दिवसही लागत नाही. फक्त 0.35 दिवसात तो हे उत्पन्न मिळवतो.

अमेरिकेतील पत्रकार सॅम पिझ्झीगटी सीईओच्या पगारावर नियंत्रण असलं पाहिजे अशी मागणी करत आहेत. त्यांनी 2016ला The Case for a Maximum Wage हे पुस्तक लिहिलं आहे. अमेरिकेत सीईओ आणि कामगार यांच्यातील पगाराची तफावत 1980शी तुलना करता आठ पटींनी वाढली आहे, असं त्यांनी लिहिलं आहे.

ते म्हणतात, "मोठ्या कंपन्यांत एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याला सीईओइतकं उत्पन्न मिळवण्यासाठी 300 वर्षं काम करावं लागेल. यासाठी मॅकडोनल्ड या कंपनीमध्ये सामान्य कर्मचाऱ्याला 3101 वर्ष काम करावं लागेल."

कारखाना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात सीईओ आणि कर्मचारी यांच्या उत्पन्नात मोठी तफावत आहे.

सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की जगभरात बऱ्याच देशांत सर्वसामान्य कर्मचाऱ्या वार्षिक उत्पन्नाइतका पगार मिळवण्यासाठी सीईओंना फार तर सरासरी एक आठवडा लागतो. दक्षिण आफ्रिकेत हा कालावधी 2.99 दिवस तर चीनमध्ये 2.11 दिवस लागतात.

14 दशलक्ष डॉलर वार्षिक पगार

सीईओंना जगभरात मिळणाऱ्या पगारात तफावत आहे. अमेरिकेत उच्चपदावरील सीईओला सरासरी वार्षिक 14 दशलक्ष डॉलर इतका पगार मिळतो.

सर्वसाधारणपणे राहणीमानावरील येणारा खर्च महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. चांगलं राहणीमान असलेल्या देशांत सीईओ आणि सर्वसाधारण कामगार यांच्या उत्पन्नातील तफावत जास्त आहे.

स्वीडन हा देश अधिक समतावादी मानला जातो. सर्वसाधारणपणे स्वीडनमध्ये सीईओंचा पगार वर्षाला 8.5 दशलक्ष डॉलर इतका आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या वर्षिक पगाराइतकं उत्पन्न मिळवण्यासाठी स्वीडिश सीईओंना 1.82 दिवस लागतात, असं Organisation for Economic Co-operation and Developmentनं म्हटलं आहे.

नॉर्वेत परिस्थिती चांगली असली तरीही तिथं सीईओंना कर्मचाऱ्याच्या वार्षिक पगाराइतकं उत्पन्न मिळवण्यासाठी 14.6 दिवस इतका कालावधी लागतो. तिथल्या सरासरी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा सीईओंचं उत्पन्न 20पट जास्त आहे.

कंपनीच्या वित्तीय अहवालानुसार नायजेरियातील Seplat Petroleum Development Companyचे सीईओ ऑस्टिन अवुरु यांचा वर्षिक पगार 1.3 दशलक्ष डॉलर इतका आहे. SalaryExplorer.comनुसार नायजेरियात वार्षिक सरासरी पगार 16,700 डॉलर इतका आहे. म्हणजे तिथं सीईओ पाच दिवसांत कर्मचाऱ्याचं वार्षिक उत्पन्न गाठू शकतात.

रशियात मोठी विषमता

रशियात ही विषमता फार जास्त असल्याचं दिसतं. रशियातील 25 सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंचा सरासरी वार्षिक पगार 6.1 दशलक्ष डॉलर इतका आहे. रशियातील सरासरी वार्षिक पगार 8040 डॉलर इतका आहे. म्हणजे तिथं सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाइतका पगार मिळवण्यासाठी सीईओंना अर्ध्या दिवसापेक्षा कमी म्हणजे 0.46 दिवस इतका कमी वेळ लागतो.

अलेक्सी मिलर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलेक्सी मिलर (डावीकडे) रशियातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत.

ब्राझिल ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. Institute for Economic Researchनुसार तिथं सीईओंचं सरासरी वार्षिक उत्पन्न 3 लाख 22 हजार डॉलर इतकं आहे. या देशात सीईओंना कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पागाराइतकं उत्पन्न मिळवण्यासाठी 8 दिवस लागतात. तर मेक्सिकोतील सीईओंना यासाठी चार दिवसांपेक्षा कमी वेळ लागतो.

काय आहेत मतं?

Harvard Business Schoolच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका लेखात सहाय्यक प्राध्यापक इथन रूआं यांनी हा फरक कर्मचारी आणि नागरिकांना समजावून सांगणे आवश्यक आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

"जेव्हा तुम्ही सीईओंचे पगार ऐकता तेव्हा त्यावर प्रतिक्रिया येणं साहजिक असतं. लोक भावनेच्या भरात प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे ज्या कंपन्या सीईंओंचे पगार जाहीर करतात त्या कंपन्यांनी वेतनातील तफावतीबद्दल विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला पाहिजे."

साफ्रा कॅटस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओरॅकलच्या सीईओ साफ्रा कॅटस यांचा समावेश जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंमध्ये होतो.

2014मधील एका सर्व्हेचा त्यांनी उल्लेख केला आहे. या सर्व्हेत अनेक लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी सीईओंचा पगार सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा चौपट जास्त असू नये अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणतात फक्त सामान्य कर्मचारी आणि सीईओ यांच्यातील पगाराची अशी तुलना न करता विस्तृत पार्श्वभूमीवर हा मुद्दा पाहिला पाहिजे.

ते यासाठी Appleचं उदाहरण देतात. Appleचे सीईओ टिम कूक अमेरिकेतील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांपेक्षा 250पट जास्त पगार घेतात.

इतर कंपन्यांशी तुलना केली तर यात तफावत दिसेल कारण Apple रिटेल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार देते, तिथं वेतन कमी असतं, म्हणजे अशी तुलना फारशी रास्त नाही.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)