तिच्यावर आहे प्रियकराच्या मांसाची बिर्याणी नोकरांना खाऊ घालण्याचा आरोप

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

प्रियकाराचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप असलेल्या मोरोक्कोच्या एका महिलेने नंतर त्याच्या मांसांची बिर्याणी बनवून पाकिस्तानी कामगारांना खाऊ घातल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.

ही धक्कादायक घटना संयुक्त अरब अमिरातीमध्ये घडली आहे.

या महिलेने तीन महिन्यांपूर्वीच आपल्या बॉयफ्रेंडचा खून केला. मात्र अलिकडेच घरातल्या ब्लेंडरमध्ये एक मानवी दात आढळून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला अशी माहितीही त्यांनी दिली.

या महिलेने गुन्हा कबूल करत तो एक 'वेडेपणाचा एक क्षण होता' असं पोलिसांनी सांगितल्याचं द नॅशनल या प्रमुख वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

या तीस वर्षीय महिलेला आता चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

खून झालेल्या व्यक्तीबरोबर सात वर्षांपासून या महिलेचं प्रेम प्रकरण सुरू होतं. प्रियकराने तिच्याऐवजी मोरोक्कोतल्या एका दुसऱ्या महिलेशी तो लग्न करण्याचा विचार करत असल्याचं तिला सांगितल्यावर तिने प्रियकराचा खून केल्याची माहिती द नॅशनल वृत्तपत्राने दिली.

या महिलेने प्रियकराचा खून कसा केला याचा उलगडा अद्याप पोलिसांना झालेला नसला तरी तिने प्रियकराच्या शरीराचे तुकडे केले आणि त्यांच्या मांसांची बिर्याणी जवळपासच्या पाकिस्तानी कामगारांना खाऊ घातली.

या घटनेचा उलगडा मृत व्यक्तीच्या भावामुळे झाला. वृत्तपत्राच्या बातमीनुसार, मृत व्यक्तीचा भाऊ त्याचा शोध घेत ओमानच्या सीमेलगत असलेल्या अल ऐन शहरातल्या या महिलेच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला घरातल्या ब्लेंडरमध्ये एक मानवी दात आढळून आला.

नंतर मृताच्या भावाने पोलिसांमध्ये आपला भाऊ हरवल्याची तक्रार नोंदवली तसंच त्याला सापडलेल्या मानवी दाताविषयी माहिती दिली.

पोलिसांनी या दाताची DNA चाचणी केल्यावर हा दात मृत व्यक्तीचाच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तपासाची चक्रं फिरली.

पोलिसांच्या माहितीनुसार संबधित महिलेने सुरुवातीला मृताच्या भावाला खोटी माहिती दिली. आपण आपल्या प्रियकराला घराबाहेर हाकलून लावल्याचं तिने भावाला सांगितलं. पण पोलिसांच्या चौकशीत ती घडाघडा बोलायला लागली. आपल्या प्रियकराचा खून केल्याचा गुन्हा तिने कबूल केला अशी माहिती दुबईस्थित गल्फ न्यूजने दिली आहे.

प्रियकराचा खून केल्यानंतर अपार्टमेंटची साफसफाई करण्यासाठी मित्राची मदत घेतल्याचंही या महिलेने सांगितलं.

मानसिक आरोग्य तपासणीसाठी आरोपी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)