मंगळावर उतरायची जागा ठरली; ExoMars शोधणार जीवसृष्टीचं अस्तित्व

फोटो स्रोत, ESA
- Author, जॉनथन अॅमॉस
- Role, सायन्स प्रतिनिधी
2020मध्ये युरोप आणि रशिया संयुक्तरीत्या मंगळावर यान पाठवणार आहेत. हे यान या मंगळावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेणार आहे.
हे यान मंगळावर कुठं उतरवायचं याची जागा नुकतीच निश्चित करण्यात आली. मंगळावर विषुववृत्तच्या भागाला Oxia Planum असं नावं आहे. तिथं हे यान उतवलं जाणार आहे.
हे यान एक प्रकारचा रोबो आहे. यान मंगळावर कुठं उतरवण्यात यावं यावर चर्चा करण्यासाठी लिस्टर युनिव्हर्सिटीत संशोधकांची बैठक झाली. संशोधकांनी सुचवलेल्या या जागेला युरोप आणि रशियाच्या अवकाश संशोधन संस्थांनी मान्यता द्यावी लागेल. The Landing Site Selection Working Group ची सूचना शक्यतो नाकारली जात नाही.
Oxia Planum या भागात माती आणि खनिजांची विविधता आहे. पाण्याचा खडकाशी सतत संपर्क आल्याने ही विविधता निर्माण झाली आहे.
या यानाचं नाव The ExoMars असं आहे. हे यान खोदकामासाठीची हत्यारही नेत आहे. भूतकाळात इथं जीवसृष्टी होती का? सध्या जीवसृष्टी आहे का? याचा शोध हे यान घेणार आहे.
दोन दिवस चाललेल्या या बैठकीत मंगळाच्या भूगर्भाचा अभ्यास असणारे तज्ज्ञ उपस्थित होते. मंगळावर यान उतरवणं हे अत्यंत किचकट काम आहे. या पूर्वीच्या अर्ध्या मोहिमा यातच अपयशी ठरल्या आहेत. 2016ला युरोपचं एक यान मंगळावर कोसळलं होतं.
संशोधकांकडे Mawrth Vallis या मंगळावरील उत्तर भागात यान उतरवण्याचाही प्रस्ताव आहे. दोन्ही ठिकाणी भूतकाळातील सूक्ष्म जीवांच्या हालचाली शोधता येण्याची शक्यता आहे. The Landing Site Selection Working Groupने Oxia हेच ठिकाण उत्तम असल्याचं म्हटलं आहे.
Oxia विषुववृत्ताच्या उत्तरेला 18 अंशात असून तिथं वर्षभर सूर्यप्रकाश मिळू शकणार आहे.

फोटो स्रोत, Airbus
The Landing Site Selection Working Groupचे सदस्य असलेले प्रा. जॉन ब्रिज म्हणाले, "हा परिसर मोठा असून प्रदीर्घ कालावधीतील सेंद्रीय घटक इथं असू शकतात. इथं 2 मीटर खोलीपर्यंत खोदकाम होऊ शकेल, असा अंदाज आहे."
हे यान 25 जुलै ते 13 ऑगस्ट 2020मध्ये झेपावेल. 19 मार्च 2021ला ते मंगळावर पोहोचेल.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








