फेसबुकनं हटवले लहान मुलांचे 87 लाख न्यूड फोटो

फेसबुक

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 3 महिन्यांत लहान मुलांची 87 लाख न्यूड फोटो काढून फेसबुकवरून काढण्यात आल्याची माहिती फेसबुकनं दिली आहे.

लहान मुलांची न्यूड चित्रं आपोआप ओळखता येतली, असं सॉफ्टवेअर यासाठी बनवण्यात आलं आहे. गेल्या वर्षीपासू या सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्यात आलं,असं फेसबुकनं म्हटलं आहे.

याचा उपयोग करून मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित संभाव्य घटनांचा शोध घेण्यात येईल, असंही फेसबुकनं म्हटलं आहे.

87 लाख फोटोंपैकी 99 टक्के फोटो कोणत्याही वापरकर्त्यानं तक्रार दाखल करण्यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहेत, असंही फेसबुकनं म्हटलं आहे.

फेसबुकवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीचा प्रसार होत असल्यानं Commons media committeeच्या अध्यक्ष डॅमियन कॉलिन्स यांनी फेसबुकवर टीकेची झोड उठवली होती.

Pedophilia व्यक्ती मुलांचे अश्लील फोटो फेसबुकवरील सिक्रेट ग्रुपमध्ये शेयर करत असल्याचं 2016मध्ये बीबीसीच्या तपासात समोर आलं होतं.

फेसबुक

फोटो स्रोत, REUTERS

"चाइल्ड न्यूडिटीला आळा घालण्यासाठी फेसबुक आता प्रयत्न करत आहे," असं फेसबुकचे सुरक्षा प्रमुख अँटिगॉं डेव्हिस यांनी म्हटलं आहे.

या संबंधीची घटना आढळ्यास वापरकर्ते तिची तक्रार फेसबुककडे नोंदवत असत. आता मात्र मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला फेसबुक स्वतंत्र पद्धतीनं आळा घालणार आहे

"अनोळखी फोटो आणि नवीन फोटो यांना प्रतिबंध घालण्यासाठी आमचे अधिकारी प्रयत्न करत आहेत," असं डेव्हिस यांनी म्हटलं आहे.

फेसबुक यासंबंधीच्या प्रकरणांची नोंद National Center for Missing and Exploited Children (NCMEC)कडे करत आहे.

फेसबुक

फोटो स्रोत, Getty Images

"मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित किती अकाउंटची माहिती फेसबुकला माहिती आहे अथवा या अकाउंटची फेसबुक कशापद्धतीनं पडताळणी करत आहे, हे फेसबुकनं आम्हाला सांगितलं नाही," असं NSPCCचे बालक सुरक्षा प्रमुख टोनी स्टोवर यांनी सांगितलं.

"आणि स्पष्टच सांगायचं तर पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे की फेसबुकच्या मालकीचे अॅप्स वापरून हे लोक मुलांना लक्ष्य करत आहेत," स्टोवर सांगतात.

विविध सोशल नेटवर्किंग साइटमुळे मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दलचा सविस्तर अहवाल स्टोवर यांना हवा आहे.

मुलांच्या लैंगिक छळाला ऑनलाईन प्रतिबंध घालणं खूपच महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)