मासिक पाळीमुळे तुमच्या मेंदूत घडतात चांगले बदल...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झरिया गॉर्व्हेट
- Role, बीबीसी फ्युचर प्रतिनिधी
मासिक पाळी झाल्यानंतर लगेचंच, स्त्रियांमध्ये त्यांच्या भोवतालची अधिक जास्त चांगली जाणीव निर्माण होते. तीन आठवड्यांनंतर मौखिक कौशल्यं बळावतात. असं दिसतंय की मासिक पाळीमुळे मेंदूवर खरंच परिणाम होतो. पण तुम्ही समजताय तसा नाही.
सुरुवातीच्या काळात एक प्रकारचा उन्माद होता. प्राचीन इजिप्तच्या वैद्यकीय किमायागारांपासून ते ग्रीसच्या तत्ववेत्त्यांपर्यंत, पुरषांनी या स्थितीवर हजारो वर्षं विचार केलेला आहे. सांगोवांगी चिन्हं फारच मोघम होती, यात चिंता आणि कामुक कल्पनाविलास हेसुद्धा होतं. पण एक गोष्ट नक्की होती की हे फक्त स्त्रियांच्याच बाबतीत होतं.
प्लेटो म्हणायचा की अशा प्रकारचा उन्माद हा गर्भधारणा न झालेल्या सुतकी गर्भाशयामुळे होत होता. त्यांच्या समकालीन लोकांचं म्हणणं होतं की असा उन्माद तेव्हाच होतो जेव्हा तो अवयव शरीरभर फिरत असतो आणि वेगवेगळ्या अवयवांमध्ये अडकून बसतो. या नंतरच्या विचाराने अगदी १९व्या शतकातदेखील पूल टाकले होते, जेव्हा ही व्याधी दूर करण्यासाठी स्त्रियांना व्हायब्रेटर द्वारे ऑरगॅझमचा अनुभव दिला जायचा.
आज सुद्धा स्त्रीच्या शारीरिक रचना तिच्या मेंदूला गोंधळात टाकू शकतात, असं मत पॉप्युलर कलचरचा अविभाज्य भाग आहे. एखादी स्त्री जर मूडी झाली असेल तर तिला 'महिन्यातले हे ते दिवस आहेत काय?' असं विचारलं जातं.
जर तिच्या मनात शारीरिक संबंधांविषयी उत्कट भावना निर्माण होत असतील तर ती कदाचित ऑव्ह्युलेट करत असेल, असं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
हे सगळं अगदीच फोल नाही - काही स्त्रियांना खरंच त्यांच्या मासिक पाळीच्या पुढे-मागे जास्त चिंताक्रांत आणि चिडचिडं वाटतं. आणि हे सुद्धा खरं आहे की जेव्हा स्त्रीच्या गर्भात अंड तयार होतं, तेव्हा तिची शरीरसंबंध ठेवण्याची उत्कटता वाढते.
(अर्थात प्रत्येकच वेळी अशा वागण्याचा एकच अर्थ लावावा, असं नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, स्त्रियांच्या तक्रारींचा संबंध 'उन्माद'सारख्या स्थितीशी आहे, असा संबंध जोडण्याच्या प्रवृत्तीमुळे घातक परिणाम होऊ शकतात.
पण हे अनेकांना माहिती नसतं की मासिक पाळीचा स्त्रियांच्या मेंदूवर चांगला परिणाम सुद्धा होत असतो.

सभोवतालचा अंदाज बांधण्यासारख्या कौशल्यांमध्ये स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीनंतरच्या काळात खूप पटाईत होतात, असं दिसून आलं आहे. तीन आठवड्यांनंतर त्या अधिक चांगल्या संवाद साधणाऱ्या होतात. आणि सरते शेवटी, त्यांच्या मासिक पाळीच्या महिन्याच्या काही काळात त्यांच्या मेंदूचा आकार जास्त मोठा असतो.
म्हणजे नेमकं काय घडतं?
याचं मुख्य कारण रुष्ट गर्भाशय नसून महिन्याभरात वेगवेगळ्या प्रमाणात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा स्त्राव करणारं अंडाशय आहे. या हार्मोन्सचं मुख्य काम गर्भाशयाच्या आतली बाजू म्हणजे लायनिंग जाड करणे आणि अंड केव्हा निर्माण करून सोडायचं, हे ठरवणे हे असतं. याचा खूप मोठा परिणाम स्त्रीच्या मेंदूवर आणि वागणुकीवर होतो.
१९३० पासून वैज्ञानिक मासिक पाळीचा अभ्यास करत आहेत. आश्चर्य म्हणजे हा अभ्यासाचा एक लोकप्रिय विषय आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की, सिगरेट सोडण्याच्या स्त्रीच्या क्षमतेपासून ते अगदी तिला रोज पडणारी वेगवेगळी स्वप्न यावर विचित्र परिणाम करणारं हा विषय आहे.
ज्ञानाचा हा डोंगर उपसण्याचं काम, स्त्रीच्या शरीरा बद्दल असणाऱ्या कुतूहलामुळे सुरु झालं नव्हतं. खरंतर, स्त्री आणि पुरुष हे वेगळे कसे आणि का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना, हा अभ्यास सुरु झाला.
उदाहरणार्थ, आपले मेंदू. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूच्या सुरकुत्यांच्या रचनेत सुद्धा फरक आहेत आणि वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की हा फरक अगदी दोघांच्या हार्मोन्स पर्यंत दिसेल. डरहम च्या विश्वविद्यालयातील न्युरो सायटिस्त मार्कस हौसमान म्हणतात, "Basically we jump on these natural fluctuations in sex hormone levels that we find," says Markus Hausmann, a neuroscientist at the University of Durham. "This might be the menstrual cycle in women, or seasonal fluctuations in testosterone levels in men. It's a full natural experiment."

फोटो स्रोत, Getty Images
स्त्रिया त्यांच्या सामाजिक कौशाल्यांमध्ये अधिक सरस असतात आणि म्हणूनच त्या वेगळ्या असतात. स्त्रियांना सहानुभूतीची भावना जास्त प्रमाणात असते आणि दुसऱ्या व्यक्तीचे विचार आणि दृष्टीकोन वेगळे असू शकतात याची त्यांना जाणीव असते.त्यांचे संभाषण कौशल्यही अधिक चांगले असते. म्हणूनच, मुली, त्यांना असू शकणाऱ्या ऑटिझम ची लक्षणं बेमालूमपणे झाकू शकतात. आणि म्हणूनच, मुलांमध्ये हाय फंक्षनिंग ऑटिझम चं निदान ४ पट जास्त होऊ शकतं.
"स्त्रिया पुरषांपेक्षा लवकर बोलतात, त्या मौखिक दृष्ट्या पुरषांपेक्षा अधिक ओघवत्या असतात, आणि त्या शब्दांची स्पेलिंग लिहण्यात पुरषांपेक्षा अधिक प्रवीण असतात," असं शिकागो मधील इलीनॉय विश्वविद्यालयातील मानसोपचारतज्ज्ञ पाओलीन माकी म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
बोलण्यात वाकबगार असणाऱ्या स्त्रिया आईच्या भूमिकेत असताना,हजारो वर्षांपूर्वी, त्यांच्या मुलांना महत्वाची माहिती, उदाहरणार्थ काही विषारी पाला खाऊ नये, देत असत. हा सामाजिक वरचढपणा यामुळेच निर्माण झाला असावा असा एक विचार आहे.
पण यात हार्मोन्स चा काही सहभाग आहे का? आणि जर असेल तर किती?
हार्मोनल समतोल
२००२ साली, त्यांच्या बाल्टिमोर इथल्या गेराँटोलोजी रिसर्च सेंटर मधील सहकाऱ्यांसोबत, माकी यांनी स्त्रियांच्या क्षमतांमध्ये एस्ट्रोजेन च्या बदलत्या पातळ्यांमुळे महिन्याभरात काय बदल होतात याचा अभ्यास हाती घेतला. सहभागी असलेल्या प्रत्येक स्त्रीचे दोनदा परीक्षण होत होते: पहिल्यांदा, त्यांची पाळी झाल्या झाल्या, जेव्हा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ची पातळी कमी असते आणि दुसर्यांदा, त्याचं ऑव्हुलेशन झाल्यानंतर एक आठवड्याने, जेव्हा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जास्त असते.
हा एक लहानसा अभ्यास होता ज्यात केवळ सोळाच महिला होत्या, ज्यांना वेगवेगळ्या बौद्धिक चाचण्या पूर्ण करायच्या होत्या. पण त्याचे निष्कर्ष लक्षवेधी होते.
जमणाऱ्या गोष्टी अतिशय वाईट असतात, उदाहरणार्थ सभोवतालचा अंदाज घेणे, त्या स्त्रियांना उत्तम जमणाऱ्या गोष्टींमध्ये अधिक चांगल्या असत. उदाहरणार्थ, नवीन शब्द शोधून काढणे. जेव्हा त्यांच्या हार्मोनची पातळी खाली जायची तेव्हा त्यांना त्यांच्या सभोवतालचा अंदाज पुन्हा यायचा.

फोटो स्रोत, Getty Images
स्त्री हार्मोन्स जास्त असताना एक क्षमता जास्त असते, ती म्हणजे 'implicit remembering', म्हणजेच एखादी गोष्ट सहजपणे लक्षात राहणे. यालाच माकी सुप्तमन किंव्हा सहज स्मृती असं म्हणतात.
जर मी तुम्हाला विचारलं, "तुम्ही उबरने शेवटचं कधी फिरला होता? त्याचं फेअर ओलापेक्षा कमी होतं की जास्त?' आणि नंतर मी तुम्हाला फेअरचं स्पेलिंग विचारलं तर, अनेक लोक ते f-a-i-r सांगतील, पण तुम्ही कदाचित तुम्ही त्याचं स्पेलिंग f-a-r-e, असं सांगाल. याचं कारण तुमच्या मेंदूने कुठेतरी 'fare' ची आधीच नोंद घेतलेली असते आणि अशी नोंद घेण्याची क्षमता यादरम्यान बळावलेली असते."
ही सुप्त स्मरणशक्ती संभाषण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. या सुप्त स्मरणशक्तीमुळेच आपण अनेकदा आपल्याला अस्पष्ट असलेले शब्द किंवा वाक्प्रचार ते कुठेतरी वाचल्यानंतर किंवा कुठेतरी ऐकल्यानंतर लगेच वापरतो.

फोटो स्रोत, Getty Images
होर्मोंस मेंदूतल्या दोन शेजारी-शेजारी असणाऱ्या असणाऱ्या भागांवर परिणाम करतात. पहिला भाग असतो तो म्हणजे सी-हॉर्सच्या आकाराचा हिप्पोकँपस, ज्याचं प्रमुख काम असतं आठवणी साठवणं. हिप्पोकँपस हा सामाजिक कौशल्यांसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, हे सिद्ध करणारे पुरावे आता वाढत चालले आहेत.
याचं प्रमुख कारण म्हणजे स्वतःच्या अनुभवांची आठवण राहिल्यामुळे, आपल्याला दुसऱ्यांच्या प्रेरणांचा अंदाज येऊ शकतो. सभोवताली स्त्री हार्मोन्स फिरत असताना हा भाग प्रत्येक महिन्यात अधिकाधिक मोठा होतो.
दुसरा भाग म्हणजे अमिगडाला. यामुळे आपल्याला भीतीसारख्या भावना आणि Fight or flight, म्हणजेच लढायचं का पळून जायचं याचे निर्णय, अशा गोष्टींवर प्रक्रिया करण्यास मदत होते. आश्चर्य म्हणजे, अमिगडालामुळे अनेक सामूहिक किंवा सामाजिक चुका टाळल्या जातात.
याचं मुख्य कारण म्हणजे, एखादी व्यक्ती का घाबरली आहे आणि आपणही भ्यायला हवं का, हे जाणून घेण्यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून जग पाहणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला ही क्षमता मिळाली की तुम्ही तिचा उपयोग अधिक चांगल्याप्रकारे करू शकता. एका बाजूला तुम्ही असत्य बोलू शकता आणि दुसऱ्या बाजूला नैतिक अंदाज बांधू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या स्त्रीची भीती ओळखण्याची क्षमता तिच्या प्रत्येक महिन्यातल्या एस्ट्रोजेनच्या पातळीनुसार वाढते. या सगळ्याला जर हार्मोन्स जबाबदार असतील तर, कदाचित यामुळे हे सुद्धा समजू शकेल की स्त्रियांकडे एकूणच अधिक चांगली सामाजिक कौशल्य का असतात. या कल्पनेला जोड मिळते ती या वस्तुस्थितीमुळे - ज्या स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेन निर्माण करण्याची क्षमता नसते त्यांची भय ओळखण्याची आणि इतरही सामाजिक कौशल्य कमकुवत असतात.
माकी यांच्या मते मासिक पाळी दरम्यान आपल्या मनावर जे काही परिणाम होतात ते केवळ योगायोग असतात. अनेक वर्ष संशोधक, असं मानत होते की या मासिक बदलांमुळे उत्क्रांतीविषयक फायदा होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर मानला जाणारा असाच एक शोध म्हणजे स्त्रियांमध्ये प्रजननक्षमता जेव्हा सर्वाधिक असते तेव्हा त्या अधिक पौरुषसंपन्न आणि बांधेसूड पुराषांना प्राध्यान्य देतात. पण हे काही खरं नाही, मोठ्या प्रमाणावर केलेल्या अभ्यासातून या निष्कर्षाला बळ देणारा काहीच पुरावा मिळालेला नाही.
मेंदूची ताकद
हे बदल का घडतात याच्या कारणाकडे दुर्लक्ष केलं तरी या बदलांमुळे फायदाच होऊ शकतो.
याचं मुख्य कारण पुरुष आणि स्त्रीच्या मेंदू मध्ये असणारा आणखीन एक मोठा फरक. स्त्रियांचा मेंदू एकाच बाजूला कमी कललेला असतो. एखादं गणित सोडवण्यासारखं एखादं काम पूर्ण करण्यासाठी, स्त्रिया आपल्या मेंदूचे दोन्ही भाग वापरण्याची शक्यता जास्त असते.
या डाव्या-उजव्या बाजू तुलनेने स्थिर असतात. हाउसमान म्हणतात, "अनेक लोकांवर त्यांच्या हातांविषयी मेंदूचा असा कल दिसून येतो. उदाहरणार्थ, मी उजवा उजव्या हाताचा आहे. यावरून माझ्या मेंदूमध्ये भाषा कुठे स्थित असेल हे सांगता येऊ शकतं. डावखुऱ्या लोकांपेक्षा उजव्या हाताच्या माणसांमध्ये अधिक प्रमाणात भाषा त्यांच्या मेंदूच्या डाव्या भागात स्थित असलेली दिसून येते."
ही खासियत उपयुक्त ठरते. याचं मुख्य कारण म्हणजे, लंगफिशपासून पालींपर्यंत बऱ्याच प्रजातींमध्ये मेंदूची रचना अशीच असते.

फोटो स्रोत, Getty Images
हे खरंच खूप मोठं गूढ आहे की अशा प्रकारची रचना स्त्रियांच्या मेंदूत कमी का दिसते. पण यातही बदल घडतात. 2002 साली हौसमान यांना असं आढळून आलं की इतर स्त्रीवाडी क्षमतांप्रमाणेच, मेंदूच्या दोन्ही बाजू वापरण्याची स्त्रियांची प्रवृत्ती त्यांच्या दर महिन्याला वाढणाऱ्या एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीनुसार बळावत जाते.
एक शक्य असलेला फायदा असंही आहे की या बदलांमुळे विचारांत अधिक लवचिकपणा येती.
हौसमान म्हणतात, "महिन्याच्या कालावधीत जेव्हा लोकांच्या मेंदूतल्या रचनांमध्ये फरक दिसतो आणि या फरकांमुळे ते कमी किंवा अधिक प्रमाणात मेंदूच्या एकाच भागाचा वापर करण्याकडे कलतात, याचा उपयोग एखादा पेच सोडवण्यासाठी मार्ग शोधण्यात होऊ शकतो. म्हणूनच, जे लोक त्यांच्या मेंदूच्या डाव्या गोलार्धाचा वापर जास्त करतात ते एखादा पेच तर्क वापरून करतात, आणि जे लोक त्यांच्या मेंदूच्या उजव्या गोलार्धाचा वापर जास्त करतात त्यांचा समग्र पद्धतीने पेच सोडवण्यावर विश्वास असतो."
तुम्हाला पुढे जर कुणी विचारलं की तुम्ही हार्मोनल आहात का तर तुम्ही अगदी सहजपणे हो म्हणू शकता. ही काही वाईट गोष्ट नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








