इथं एका डुलकीसाठी मोजावे लागतात 1780 रुपये

फोटो स्रोत, Getty Images
न्यूयॉर्क शहरात थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी डुलकी केंद्र उघडण्यात आली आहेत. या केंद्रांत जाऊन तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता.
Nap Store नावानं ही केंद्र उघडण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये 45 मिनिटांच्या झोपेकरता 25 डॉलर म्हणजेच 1780 रुपये मोजावे लागतात.
न्यूयॉर्कमधल्या एका मॅट्रेस ब्रँडनं आपल्या उत्पादनांच्या प्रमोशनकरता ही शक्कल लढवली आहे.
असा तरुण वर्ग ज्यांना वस्तूंपेक्षा अनुभवांवर जास्त पैसे खर्च करायची इच्छा आहे, त्यांना आकर्षित करण्यासाठी ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
न्यूयॉर्कमध्ये फक्त Nap Store ची डुलकी केंद्र नाहीत. शहरात इतर अनेक केंद्र आहेत जी वेळेनुसार भाडं आकारतात. जे 15 ते 50 डॉलरच्या म्हणजेच 1000 रुपये ते 3500 रुपयांच्या दरम्यान असतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




