सिअॅटल एअरपोर्टवरून 'पळवलेलं' विमान बेटावर कोसळलं
सिअॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सगळी विमानं नेहमीप्रमाणे उभी होती. तेवढ्यात अचानक एक विमान हवेत झेपावलं आणि निघून गेलं... कुठल्याही प्रवाशांविना!
एअरपोर्ट प्रशासनानुसार एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्यानेच परवानगीशिवाय हे टेकऑफ केलं होतं. त्यानंतर लगेच दोन F15 फायटर जेट त्याचा पाठलाग करू लागले. विमानतळही बंद करावं लागलं.
पण काही वेळाने ते विमान समुद्रात एका बेटावर क्रॅश झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात तो पायलट वाचला की गेला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तो वाचला असण्याची शक्यता कमी आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
विमान उडवणारी व्यक्ती 29 वर्षांचा एक स्थानिक तरुण असल्याचं सांगत पोलिसांनी कट्टरवादी हल्ल्याची शक्यता फेटाळली आहे.
पीअर्स काउंटीच्या शेरिफनी सांगितलं, "मला वाटतं की तो फक्त मजा करायला प्लेन घेऊन पळाला होता. पण काहीतरी खूप भंयकर झालं." ABC7 News बरोबर बोलताना त्यांनी अतिरेकी हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली. "कुठलाही अतिरेकी समुद्रावर विमानातून अशा घिरट्या घालणार नाही."

फोटो स्रोत, Reuters
सॅटलाईट टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार एअर ट्रॅफिक विभागाने त्याला विमान लँड करण्याचं आवाहन केलं. पण तो "मस्तीत आणि बेफिकीर वाटत होता".
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या विचित्र उड्डाणाचं व्हीडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच झळकले.
Horizon Air Q400 नावाचं हे विमान हॉरिझॉन एअरलाईन्सचे पार्टनर अलास्का एअरलाईन्सचं होतं. या विमानात साधारणपणे 78 लोक बसू शकतात.
दक्षिण केट्रॉन बेटावर एक सैनिकी केंद्राजवळ ते कोसळलं. उपलब्ध झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये विमानात किती इंधन आहे, याची त्या व्यक्तीला काळजी वाटत असल्याचं लक्षात येतं.

फोटो स्रोत, CBS
विमानतळाने जारी करून सांगितलं की विमानतळावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









