मी माझा चेहरा वापरायला परवानगी दिली, पण तो बाजारात विकला गेला

शबनम खान

फोटो स्रोत, Shubnam Khan

    • Author, सोराया ऑवेर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तुमचा फोटो तुमच्या नकळत एखाद्या जाहिरातीत झळकला तर? किंवा एखाद्या वेबसाईटवर तुमच्या अपरोक्ष कोणीतरी काही प्रतिक्रिया दिली तर? आश्चर्य वाटेल ना? दक्षिण अफ्रिकेतल्या शबनमबरोबर अशीच घटना घडली आहे.

कधी एखाद्या जाहिरातीत त्या स्थलांतरितांचं स्वागत करत असतात तर कधी न्यूयॉर्क शहरात कार्पेट विकत असतात. कधी त्या कंबोडियामध्ये एखाद्या ट्रेकचं नेतृत्व करत असतात. हेही नाही जमलं तर त्या फ्रान्समध्ये प्रेमाचा शोध घेत असतात. त्यांचा चेहरा त्यांच्या नकळत असा जगभर फिरत होता.

त्यांचा चेहरा चीनच्या मॅकडोनल्डच्या जाहिरातीत झळकतो तर कधी तो व्हर्जिनियाच्या डेंटिस्ट्रीच्या एखाद्या जाहिरातीत दिसतो.

हा सगळा प्रकार 2012 सालापासून त्यांच्याबरोबर सुरू झाला. एक दिवशी त्यांच्या एका मैत्रिणीने शबनमचा एक फोटो एका फेसबुक पेजवर पोस्ट केला. स्थलांतराच्या एका जाहिरातीवर हा फोटो होता.

"ही तुझ्यासारखी दिसतेय," असं एका मैत्रिणीने पोस्ट केलं. अनेकांनी त्याला दुजोरा दिला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"स्थलांतराच्या बाबतीत जाहिरातींमध्ये असण्यात मला काहीच अडचण नव्हती. पण मी खूप गोंधळलेले होते." त्या दक्षिण अफ्रिकेतल्या डर्बनहून बीबीसीशी बोलत होत्या.

"जगाच्या दुसऱ्याच एखाद्या भागात माझा फोटो का होता याचं कोडं मला उलगडत नव्हतं," त्या पुढे सांगत होत्या.

"हे सगळं मी आठवायचा प्रयत्न करत होते तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला आठवण करून दिली, अगं तू काही वर्षांपूर्वी फोटो शूट केलं होतं, आठवतंय का?"

आम्ही ती सूचना वाचलीच नव्हती

दोन वर्षांपूर्वी शबनम आणि तिच्या विद्यापीठातल्या काही मैत्रिणी फुकट झालेल्या एका फोटो शूटसाठी गेल्या होत्या. 100 faces shoot असं त्या शूटचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याला फोटो काढण्याची परवानगी दिली तर त्यानं एक पोर्टफोलिओ देण्याचं आमिष दाखवलं.

"मला असं वाटलं की ते सगळे फोटो पोर्टफोलिओ किंवा एका आर्ट प्रोजेक्टसाठी वापरले जातील," त्या म्हणाल्या.

"हे सगळं खूप घाईगडबडीत झालं. एका पेपरवर सही करायची. तुम्ही आत गेल्यावर फोटोसाठी स्माईल करायचं. हे खूपच घाईत झालं पण त्याचा वापर स्टॉक फोटोसाठी होईल असं मला सांगितलं नव्हतं."

"मला असं वाटलं की ते गंमत करत आहेत." स्टॉक फोटोज पाहून त्यांची ही प्रतिक्रिया होती. "पण नंतर माझे इतके फोटो दिसले आणि मला त्याचे पैसैसुद्धा मिळाले नव्हते."

"आम्ही सुरुवातीपासूनच त्यावर सही केली होती. छोट्या आकारातली ती अक्षरं आम्ही वाचलीच नव्हती त्यामुळे सगळा गोंधळ झाला होता," असं शबनमने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

'हा अप्रामाणिकपणाचा कळस होता'

कुणीतरी शबनम यांना गुगल मध्ये Reverse Image Search करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तुम्ही शोधत असलेल्या फोटोशी साधर्म्य साधणारा फोटो तुम्हाला दिसतो.

"मी जवळजवळ 50 पेक्षा जास्त वेगवेगळ्या रुपात स्वत:ला पाहिलं. माझा चेहरा प्रसिद्ध होता आणि मलाच ते माहिती नव्हतं."

अशा अनेक जाहिरातीचं त्यांना नंतर काही वाटेनासं झालं. नंतर मात्र वेगवेगळ्या वेबसाईटवर ग्राहक जो प्रतिसाद देतात तिथेही त्यांना त्यांचा चेहरा दिसला.

"ते माझ्यासाठी सगळ्यांत धक्कादायक होतं," त्या सांगतात.

"स्टॉक इमेजेसचं काम कसं चालतं हे मला माहिती होतं. म्हणजे एखादं घर दाखवायचं असेल तर घराचा फोटो दाखवणारच हे मला कळत होतं. पण मी फारच मूर्ख ठरले. स्टॉक इमेजेसचा वापर चुकीचे प्रतिसाद आणि खोटी नावं लिहिण्यासाठी होतो हे माझ्यासाठी अगदीच नवीन होतं."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग एडिट करून एका ब्यूटी प्रॉडक्टसाठी त्यांचा फोटो वापरला होता. तसंच गरोदरपणानंतर काही जणींना त्वचेवर डाग पडतात. त्या जाहिरातीतही त्यांचा फोटो नाव बदलून टाकला होता हे बघून तर त्यांना धक्काच बसला.

"2013 पर्यंत हे प्रमाण फारच वाढलं तेव्हा त्यांनी फोटोग्राफरला मदतीसाठी फोन केला. त्यांना असं वाटलं की तो नाही म्हणेल." त्याच्याबरोबर झालेलं संभाषण शबनमला चांगलंच आठवतं.

"त्याला विचारण्यासाठी मला बरंच धैर्य एकवटावं लागलं. कारण मला वाटलं की तो नाही म्हणेल. मी म्हणाले की आपण स्वाक्षऱ्या केल्या होत्या याची मला कल्पना होती, पण माझ्या फोटोचा असा वापर होईल असं मला वाटलं नव्हतं."

"तो म्हणाला की झाल्या प्रकाराचं त्यालाही वाईट वाटतं. माझ्याबरोबर अन्याय झाला आहे हे मला माहिती होतंच पण ते सगळं कायदेशीर होतं आणि आम्हाला त्याची कल्पना दिली होती. कारण मी लेखिका असल्यामुळे मला लोक ओळखू शकतील अशी मी तक्रार केली होती." त्यांनी ट्वीट केलं.

सहज म्हणून घेतलेल्या फोटोचा असा वापर होईल असं सांगण्यात आलं नव्हतं यावर त्या अजूनही ठाम आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्या म्हणतात, "ते स्टॉक फोटोज असतील असं मला कोणीही सांगितलं नाही. माझ्या नावाची अशी तोडमोड होईल असंही कोणी सांगितलं नाही. मला जर असं कोणी सांगितलं असतं तर मी त्यावर कधीही स्वाक्षरी केलीच नसती."

हे टाळण्यासाठी काय करावं?

ज्या 100 लोकांचं शबनमबरोबर फोटोशूट झालं त्यांनीही आपले फोटो इंटरनेटवर शोधले. शबनमला त्यांचे फोटो तर दिसले नाही, पण इतर जणांबरोबरही असंच काही झाल्याचं सांगितलं.

फोटोग्राफरने सुद्धा आश्वासनाचं पालन करत स्टॉक फोटोजच्या वेबसाईटवरून फोटो काढले. तरीही शबनमला त्यांचे फोटो दिसतातच.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

याबद्दल कुणीही आवाज उठवला नाही, पण शबनम यांना हे प्रकार बाहेर आणल्याचं जास्त समाधान आहे. काही दिवसांपूर्वी एका घराच्या जाहिरातीत त्यांचा एक फोटो त्यांना दिसला.

शबनमची ही कथा ट्विटवर व्हायरल झाली तेव्हा अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपले फोटोही असंच शेअर झाल्याचं त्यांनी सांगितलं.

शबनम फोटोग्राफरला दोष देत नाहीत आणि तसंच कायदेशीर कारवाईही करणार नाहीत.

ही एक चांगली स्टोरी आहे ,पण ही कथा त्या आता एक इशारा म्हणून सगळ्यांना सांगतात.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

"आपला कसा वापर झाला हे मला आता कळलं. मी फार मूर्खपणा केल्याचं मला जाणवलं, पण लोकांनीही अशी चूक करू नये असं मला वाटतं."

"फुकटच्या फोटोसाठी नोंदणी करू नका. ज्यावर सही करणार असाल तर ते नीट वाच आणि इंटरनेटवर असलेल्या सगळ्यांच गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कॅमेराच्या झगमगाटात वाहून जाऊ नका. आपण काय करतोय त्याचा नीट विचार करा आणि तुम्ही कुठे जाताय हे नीट बघा," अशा शब्दांत त्या इतरांना सावध करतात.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

"ही अगदी छोटी गोष्ट वाटू शकते पण तुम्ही तुमचा चेहरा विकताय हे लक्षात असू द्या. कारण मी माझा चेहरा विकला आहे."

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)