या गावाच्या दिशेने येतोय हा महाकाय हिमनग

फोटो स्रोत, Reuters
पश्चिम ग्रीनलॅंडमध्ये एक महाकाय हिमनग एका गावापर्यंत वाहून आला आहे. हा हिमनग तुटून निर्माण होणाऱ्या लांटाचा धोका लक्षात घेऊन या गावातील काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
ग्रीनलँडच्या सीमेवर इनारसूट नावाचं हे गाव आहे. इथले अधिकारी सांगतात की इतका मोठा हिमनग या गावानजीक पूर्वी कधीच पाहण्यात आला नव्हता.
पण हा हीमनग जमिनीत रुतला असून तो लगेच पुढं सरकण्याची भीती नाही. तरीही या किनाऱ्यानर राहणाऱ्या 169 नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आलं आहे, अशी माहिती रिटझाऊ या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
गेल्या उन्हाळ्यात वायव्य ग्रीनलँडमध्ये आलेल्या भूकंपात चार जणांचा बळी गेला होता.
इनारसूट ग्राम परिषदेच्या सदस्य सुझन इलिसेन यानी स्थानिक वृत्तपत्राला सांगितलं, "या हिमनगाला तडे गेले आहेत, त्याला छिद्रही दिसतय. तो कधीही तुटेल, अशी आम्हाला भीती वाटते."
या गावाचं वीजनिर्मिती केंद्र समुद्रकिनाऱ्यावर आहे.
ग्रीनलँडमधील हिमविस्तार
- बर्फाच्छादित परिसर - 17.99 लाख चौरस किलोमीटर
- बर्फाचं एकूण वस्तुमान - 29.9 लाख घन किलोमीटर
- सरासरी आकार - 1,673 मीटर
- सर्वाधिक आकार - 3,488 मीटर
अंटार्क्टिकावरील बर्फाचं एकूण वस्तुमान - 2 कोटी 65 लाख घन किलोमीटर इतकं आहे.

काही तज्ज्ञांनी हवामान बदलामुळे हिमनग तुटण्याच्या घटना वाढतील, असा इशारा यापूर्वीच दिला आहे. यामुळे त्सुनामीचा धोका वाढू शकतो.
जून महिन्यात न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पूर्व ग्रीनलँडमधील हिमनदीतून भला मोठा हिमखंड तुटल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध केला होता.
हे पाहिलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








