भारतात सापडलेल्या हिऱ्याची तब्बल 45 कोटींना विक्री

फोटो स्रोत, EPA
गेल्या 300 वर्षांपासून यूरोपातल्या वेगवेगळ्या राजघराण्यांची शान असलेल्या जगातला सर्वांत मोठा निळा हिऱ्याचा (ब्ल्यू डायमंड) पहिल्यांदाच लिलाव करण्यात आला आहे. अत्यंत दुर्मिळ असलेला हा हिरा जिनेव्हामध्ये 67लाख डॉलर म्हणजे जवळपास 45 कोटींमध्ये विकला गेला.
1715 मध्ये एलिझाबेथ फर्नासी यांचं स्पेनच्या फिलीप पंचम यांच्याशी लग्न झालं. तेव्हा त्यांना लग्नात 'फर्नसी ब्ल्यू' भेट म्हणून मिळाला होता. एलिझाबेथ फर्नासी या ड्यूक ऑफ पर्मा यांच्या कन्या होत्या.
300 वर्षांपर्वी भारतातल्या गोवळकोंडा खाणीत सापडलेला हा 6.1 कॅरेटचा 'फर्नसी ब्ल्यू डायमंड' स्पेन, फ्रांस, इटली आणि ऑस्ट्रियाच्या राजघराण्यांकडे वेगवेगळ्या काळात होता.

फोटो स्रोत, Getty Images
सोदबीझमध्ये झालेल्य लिलावात फक्त 4 मिनिटं यावर बोली लावण्यात आली. बोलीची किंमत 35 लाख डॉलर ते 50 लाखा डॉलरपर्यंत मिळेल अशी आशा होती.
सोदबीझच्या ज्वेलरी स्पेशालिस्ट डॅनिएला मशेती सांगतात, "आम्हाला चांगल्या किंमतीची अपेक्षा होती. पण आम्ही सुरूवात 35 लाख डॉलरपासून केली आणि 67 लाख डॉलरपर्यंत बोली लावण्याच आली, हे आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होतं."
"हिऱ्याची किंमत ठरते ती त्याच्या पैलूंवर. कारागीर कट्स आणि शेपचा खेळ करत परवडणाऱ्या हिऱ्यांपासून अनमोल हिऱ्यांपर्यंत अनेक प्रतीचे हिरे घडवतात."
फ्रेंच राणी मॅरी एंटोनेट यांच्या मुकूटात हा पेअर अकाराचा हिरा बसवण्यात आला होता, अशी माहिती लिलाव करणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
पण, हा हिरा कोणी विकत घेतला आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









