पॅरिस : 'अल्लाह हू अकबर'ची घोषणा देत चाकू हल्ला, 1 ठार

पॅरिस हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरिस हल्ला

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका संशयीत दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी 2 जणांची तब्येत गंभीर आहेत. पॅरिसच्या ऑपेरा परिसरात झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मारेकरी मृत्युमुखी पडला आहे.कथित इस्लामिक स्टेट या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे."फ्रान्सनं आज पुन्हा रक्त सांडलं आहे. पण स्वातंत्र्याच्या शत्रूंना आम्ही एक इंचही जागा देणार नाही," असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी म्हटलं आहे.

मारेकरी "अल्लाह हू अकबर" असं ओरडत होता, असं प्रत्यक्षर्शींनी सांगितलं आहे. फ्रान्स-24 या वृत्तसंस्थेनं प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पोलिसांनी मारेकऱ्याला 2 गोळ्या झाडल्याचं म्हटलं आहे.पॅरिसच्या ऑपेरा भागात ही घटना घडली आहे. हा भाग नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे.

फ्रान्स हल्ला

फोटो स्रोत, AFP

फ्रान्सचे गृहमंत्री जेरा कोलो यांनी पोलिसांच्या कारवाईची प्रशंसा केली आहे. "घटनेतल्या पीडित लोकांविषयी मला सहानुभूती आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अस आवाहन फ्रान्सच्या पोलिसांनी केलं आहे. "अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या सूचनाच शेअर करा," असं पोलिसांनी ट्वीट केलं आहे.गेल्या 3 वर्षांपासून फ्रान्समध्ये सतत हल्ले होत आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये हाय अलर्ट जारी आहे. यातल्या काही हल्ल्यांची जबाबदारी कथित इस्लामिक स्टेटनं घेतली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)