कॉमनवेल्थ गेम्स LIVE : बजरंग पुनियाला 65 किलो वजनी गटात गोल्ड मेडल

कु्स्ती

फोटो स्रोत, Getty Images

कुस्तीपटू बजरंग पुनियानं 65 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. हे भारताचं 17 वं गोल्ड मेडल आहे.

बीबीसी

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय खेळाडू इरफान थोडी आणि राकेश बाबू यांना खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. नो निडल धोरणाचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या खोलीमध्ये निडल सापडल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ भारतात पाठवण्याची कारवाई करण्यात आली आहे.

अवघ्या 15 वर्षांच्या अनिश भानवालानं भारताला 16वं गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. 25 मीटर रॅपिड फायर पिस्ल प्रकारात त्याला हे गोल्ड मिळालं आहे.

तेजस्विनी सावंतनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर याच प्रकरात भारताच्या अंजुम मुदगील हिला रौप्य पदक मिळालं आहे.

तेजस्विनी सावंत

फोटो स्रोत, Getty Images

राहुल आवारेनं अंतीम फेरीत कॅनडाचा कुस्तीपटू ताकाहाशीला पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं आहे. भारताची नेमबाज तेजस्विनी सावंतने 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे गुरूवार गोल्ड कोस्टला महाराष्ट्राचा दिवस ठरला.

सुशील कुमार

फोटो स्रोत, Getty Images

राहुल आवारे पाकिस्तानच्या मुहम्मद बिलालला 12-8 असं नमवत 57 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली. अंतीम फेरीत कॅनडाच्या कुस्तीपटूला नमवत सुवर्णपदाला गवसणी घातली. राहुल पाठोपाठ सुशील कुमारनंही 74 किलो वजनी गटात अंतीम फेरी गाठून गोल्ड पटकावलं.

राहुल आवारे

फोटो स्रोत, Gokul Aware

राहुलसह सुशील कुमार आणि महिला गटात बबिता फोगटनं आपापल्या गटांत अंतिम फेरीत गाठल्याने किमान रौप्य पदकाची निश्चिती केली आहे. बबिताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

2011 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत राहुलने कांस्यपदक मिळवलं होतं. त्याचवर्षी झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत राहुलने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

तेजस्विनीला रौप्यपदक मिळालं. अंजुम मोडुगिलला 16व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

सुशील, बबिताही गोल्डच्या शर्यतीत

बबिता फोगटने 53 किलो वजनी गटात सलाीच्या लढतीत सॅम्युएल बोसला 3-1 असं हरवलं.

भारताचा अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमारनेही अंतिम फेरीत धडक मारली. सुशीलने 2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती.

बबिता फोगट

फोटो स्रोत, Getty Images

2010 मध्ये मॉस्को येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुशील सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुशीलने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2014 मध्ये ग्लासगो स्पर्धेतही सुशीलनेच सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. गोल्ड कोस्ट येथे सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक करण्यासाठी सुशील आतूर आहे.

2006 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही सुशीलने कांस्यपदक पटकावलं होतं. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची 4 तर कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धेची तब्बल 6 पदकं सुशीलच्या नावावर आहेत.

बीबीसी प्रतिनिधी रेहान फजल ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टला होणाऱ्या या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी गेले आहेत. त्यांनी रेसलिंग इव्हेंटचा दिलेला हा वृत्तांक ऐका -

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)