'आणखी एक पीडित, आणखी एक झैनब!' चिमुकलीच्या बलात्कार-खुनाने पाकिस्तानात संतापाचा लाट!

ही घटना म्हणजे समोर आलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ही घटना म्हणजे समोर आलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक आहे.
    • Author, नुरुसबा गर्ग
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग

पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या एका मुलीच्या मृत्यूमुळे पाकिस्तानात संतापाची लाट आहे. या मुलीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर निषेधाचे सूर उमटत आहेत.

काही खात्रीलायक माहिती सध्या उपलब्ध झाली आहे, पण प्रसारमाध्यमांच्या बातम्यांच्या आधार घ्यायचा झाला तर ही मुलगी काही पदार्थ घेण्यासाठी घरून निघाली होती. तेव्हाच ती बेपत्ता झाली.

नंतर तिच्या कुटुंबीयांना ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जळल्याच्या खुणा होत्या. नंतर तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. पुढे तिला लाहोरमध्ये प्रोव्हिन्शिअल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. पण अखेर 9 एप्रिलला तिचा मृत्यू झाला.

पाकिस्तान

फोटो स्रोत, BOI TV

"ती संपूर्णपणे जळली. सगळं नष्ट झालं होतं. तिचा प्रचंड छळ झाला होता," असं नूरची आई अमिना बीबी यांनी BOI TV ला दुसऱ्या दिवशी एका मुलाखतीत सांगितलं.

शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं सांगण्यात येतं. काही माध्यमांच्या मते तिच्या शरीरावर जळाल्याच्या खुणा एका अपघातातून आल्या असाव्यात. पण दोन्ही बाजूंनी खात्रीलायक वृत्त आलेलं नाही.

यादरम्यान स्थानिक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि संशयिताला अटक केली आहे. न्यायवैद्यक चाचण्यांनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल अशा बातम्या प्रसारमाध्यमात आल्या आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. साहिवाल येथील मोठ्या प्रमाणावर लोक निदर्शनं करत आहेत.

लाहोरमधील पाकिस्तान टुडे या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार मुलीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लोक "मुलीला न्याय हवा, आरोपींना फासावर लटकवा," अशी मागणी करणारे बॅनर आंदोलक घेऊन जात असल्याचं या बातमीत पुढे म्हटलं आहे.

ट्विटरवर उद्रेक

"JusticeForNoorFatima" हा हॅशटॅग पाकिस्तानमध्ये टॉप ट्रेंड होता. अनेक लोकांनी या घटनेची तुलना सहा वर्षांच्या झैनब अमीन या मुलीच्या खुनाशी केली. तिचा मृतदेहसुद्धा यावर्षाच्या सुरुवातीला पंजाबच्याच कौसर जिल्ह्यात सापडला होता.

"हो, ती फक्त आठ वर्षांची आहे. आणखी एक झैनाब, बलात्कार करून, जाळून तिचा चिचावटणी येथे खून करण्यात आला. आम्ही आमच्या मुलांचं रक्षण करण्यासाठी असमर्थ आहोत," असं आयेशा नावाची एक युजर म्हणते.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याबद्दल अनेकांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. सय्यदा हुरेन म्हणतात, "हे अत्यंत लाजिरवाणं आहे. सरकार कुठे आहे? या गुन्ह्यांत वाढ का होत आहे?"

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

16,000 फॉलोअर्स असलेल्या सेहरिश खान यांनी ट्वीट केलंय - "पहिली गोष्ट तुम्ही न्यायाची मागणी करणार की या सरकारला काही शिक्षा देणार? ही आग प्रत्येक घरात पोहोचायला हवी आणि प्रत्येक मुलीसाठी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

"आणखी एक पीडित, आणखी एक झैनब. निषेध करणं सोपं आहे, पण त्याचबरोबर पालकांचं दु:ख समजून घेणं तितकंच अवघड आहे. आम्ही सरकारला जागं होण्याचं आवाहन करतो. अशा गुन्ह्यांपासून तुम्ही देशाला वाचवा. तुम्ही एक जबाबदार सरकार आहात आणि एक दिवस त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा," असं पाकिस्तान पीपल्स पार्टीचे समर्थक अब्दुल करीम गुडू यांनी ट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

यादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात या मुलीचा मृतदेह गुंडाळलेला दिसत आहे. त्यात उर्दूत "नूर फातिमा, चिचावटणीची मुलगी" असं एक कॅप्शन दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

हिमनगाचं टोक

ही घटना म्हणजे समोर आलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक आहे. साहिल या स्वयंसेवी संस्थेनं या प्रकरणांची आकडेवारी गोळा केली आहे. ही संस्था लहान मुलांच्या रक्षणावर काम करते. त्यातही विशेष भर लैंगिक छळावर असतो.

2017च्या पहिल्या सहा महिन्यात पाकिस्तानमध्ये 1,764 बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. पण ही आकडेवारी म्हणजे फक्त हिमनगाचं एक टोक आहे. फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी अशी अनेक प्रकरणं दाबून ठेवली जातात.

'साहिल' संस्थेच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2017 ते जून 2017 दरम्यान 62 टक्के प्रकरणं एकट्या पंजाबमधून होती.

2016 साली पाकिस्तानच्या संसदेनं अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला, चाईल्ड पॉर्नोग्राफी अशा प्रकरणांना गुन्हेगारी दर्जा दिला आहे. पण लैंगिक अत्याचार ही सखोल सामाजिक समस्या आहे. फक्त कायदा या समस्येशी लढण्यास असमर्थ आहे.

नूर फातिमा प्रकरणावर भाष्य करताना डेली टाइम्स या इंग्रजी वर्तमानपत्र म्हणतं, "लहान मुलींवर बलात्कार ही राष्ट्रीय समस्या आहे. पण या समस्येचा तोडगा काढण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरलं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)