ट्रंप-पॉर्नस्टार प्रकरणातल्या या 11 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयनं वैयक्तिक वकिलांच्या कार्यालयावर घातलेले छापे अशोभनीय आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी टीका केली आहे. असे छापे म्हणजे आपल्या देशावरचा हल्ला आहे, असंही ते पुढे म्हणाले.

मायकेल कोहेन आणि त्यांच्या अशील यांच्यातील व्यवहारांची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. पॉर्नस्टारला देण्यात आलेल्या पैशांसंदर्भातील कागदपत्रं एफबीआयनं ताब्यात घेतली आहेत.

2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीदरम्यान आर्थिक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कोहेन यांची चौकशी सुरू आहे.

कथित प्रेमसंबंधांची वाच्यता करू नये यासाठी पॉर्न चित्रपटातील अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल हिला आपल्या वकिलानं एक लाख 30 हजार डॉलर दिल्याबद्दल माहिती नाही, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. ट्रंप यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा स्टॉर्मी डॅनियलने केला आहे.

या संबंधांची वाच्यता करू नये यासाठी ट्रंप यांचे वकील मायकेल कोहेन यांनी 2016च्या निवडणुकांपूर्वी डॅनियलला पैसे दिल्याचे समोर आलं होतं.

ट्रंप यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. पॉर्न स्टारला पैसे दिल्याची कबुली कोहेन यांनी दिली होती. मात्र ट्रंप ऑर्गनायझेशन आणि ट्रंप प्रचार गटाचा याप्रकरणाशी संबंध नाही.

निवडणुकीदरम्यान बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्रंप यांचे स्टॉर्मीसोबत संबंध असल्याचा गाजावाजा करण्यात आला. अफवांमुळे बदनामी टाळण्यासाठी प्रकरण वाढू नये याउद्देशाने पॉनस्टार स्टॉर्मी डॅनियलला पैसे दिले. याशिवाय तिच्यासोबत झालेला व्यवहार हा कायदेशीर होता असा दावाही कोहेन यांनी केला होता.

दरम्यान डॅनियलसंदर्भातील वक्तव्यामुळे ट्रंप आणि त्यांच्या विधी टीमसमोरील अडचणी वाढल्या आहेत. प्रेमसंबंधांची माहिती उघड करू नये यासाठी स्टॉर्मी डॅनियल आणि ट्रंप यांच्या वकिलांत करार झाला होता. मात्र या करारात ट्रंप यांची स्वाक्षरी नसून ते पक्षकार नाहीत. त्यामुळे तो करार वैध नसल्याच्या मुद्यावर हा खटला उभा आहे.

ट्रंप यांनी या कराराबद्दल माहिती नसल्याचं सांगितल्यानं वरील दाव्याला पुष्टी मिळाल्याचे मानले जात आहे.

डॅनियल यांचे आरोप काय?

1) लेक टाहो येथे झालेल्या चॅरिटी गोल्फ स्पर्धेवेळी ट्रंप यांची भेट झाली.

2) त्यांनी डिनरसाठी निमंत्रण दिलं आणि हॉटेल रुममध्ये भेट झाली.

3) हॉटेल रुममध्ये पजामा पँट्समध्ये असलेले ट्रंप कोचावर पसरले होते.

4) त्यांच्यात संभोग झाला.

5) ट्रंप यांनी आमचं अफेअर जाहीर केलं नाही.

6) 2016 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोहेन यांच्याकडून 130, 000 डॉलर्स स्वीकारले.

7) 2016 अॅग्रीमेंट वैध नाही कारण ट्रंप यांची त्यावर स्वाक्षरी नाही.

ट्रंप यांचे उत्तर काय?

8) अफेअर अजिबात नाही.

9) दोघांदरम्यान झालेल्या अॅग्रीमेंटची कलमं फॉलो न केल्याबद्दल डॅनियएलवर खटला.

10) डॅनियलला पैसे दिल्याची कोहन यांची कबुली

11) मात्र पैसे देण्यात वैयक्तिक किंवा कंपनीचा सहभाग नसल्याचा ट्रंप यांचा दावा

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)