रशियात सोन्याचा पाऊस! विमानाचा दरवाजा उघडा राहिल्याचा परिणाम

फोटो स्रोत, YAKUTIAMEDIA.RU
पूर्व रशियातल्या एका प्रांतात प्रवासादरम्यान विमानाचा दरवाजा आश्चर्यकारकरीत्या उघडा राहिला. दरवाजा उघडा राहिल्यानं विमानातल्या काही किलो सोन्याची पखरण रनवेवर झाली.
रशियातल्या सायबेरिया प्रदेशातील याकुत्सुक विमानतळावरून काहीशे टन सोनंचांदी घेऊन जाणारं विमान निघण्याच्या तयारीत होतं. प्रयाणादरम्यान लोडिंग हॅच ब्रेक निकामी झाला आणि दरवाजा उघडा राहिला.
प्रत्येकी 20 किलो वजनाची 200 सोने-चांदी बिस्किटांचा खच रनवेवर अंथरला गेला.

फोटो स्रोत, YAKUTIAMEDIA.RU
हे सगळं सोनं-नाणं कॅनडातील एका खाणमालकाचं होतं. हा सगळा पसरलेला ऐवज गोळा करून जमा करण्यात आल्याचं इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने स्पष्ट केलं.
या अपघाताचं नेमकं कारण काय याचा चौकशी पोलीस करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




