पाकिस्तान : मानवी हक्क कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचं निधन

फोटो स्रोत, AFP
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या आसमा जहांगीर यांचं पाकिस्तानातील लाहोरमध्ये निधन झालं.
त्या पाकिस्तान सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षा होत्या. बीबीसीशी बोलताना मुंजे जहांगीर यांनी आईच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या मुंजे जहांगीर देशाबाहेर आहेत. त्यांच्या भावाने त्यांना हे वृत्त दिलं असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
रविवारी आसमा यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, AFP
आसमा यांचा जन्म 27 जानेवारी 1952मध्ये लाहोर येथे झाला होता. लाहोरच्या कॉन्वेंट ऑफ जिजस अॅंड मेरी येथून त्यांनी पदवी घेतली. पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
कायद्याचं पुढील शिक्षण त्यांनी स्वित्झर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेला घेतलं. लाहोरच्या कायदे आझम लॉ कॉलेजमध्ये त्यांनी राज्यघटनेचे अध्यापन केले आहे.
पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या बार अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्या अनेक वर्षं झटल्या.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








