You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपानच्या राजकुमारीचं लग्न पुढं ढकललं?
जपानच्या राजकन्या माको यांनी के कोम्युरो यांच्याशी होणारा विवाह 2020 पर्यंत पुढे ढकलल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.
राजा अखितो यांची 26 वर्षीय नात माको यांचा विवाह, खाजगी कंपनीत काम करणाऱ्या के कोम्युरो यांच्याशी नोव्हेंबरमध्ये होणार होता.
लग्नाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत, हा विवाह पुढे ढकल्याचं या दोघांनी जाहीर केल्याचं वृत जीजी प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
राजे अखितो हे पुढच्या वर्षी पदत्याग करणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर राजघराण्याचं वेळापत्रक व्यग्र आहे.
"आमच्या लग्नासाठी ज्यांनी मदत केली त्यांना या निर्णयामुळे जो त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागते," असं माको यांनी म्हटल्याचं AFP या वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं आहे.
कोम्युरो यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्यांना राजकन्येचा किताब गमवावा लागेल.
राजे अखितो यांचा पदत्याग आणि युवराजांचा राज्याभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यानंतर त्या दोघांचा लग्न करण्याचा विचार असल्याचं राजघराण्याच्या प्रवकत्यानं सांगितलं.
एका मासिकानं कोम्युरो यांच्या घरी कथित आर्थिक अडचण असल्याचं वृत्त दिलं होतं. त्याच्याशी या घोषणेचा काही संबंध नसल्याचं राजघराण्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्याचं जीजी या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
200 वर्षांच्या इतिहासात, सिंहासनावरून पायउतार होणारे राजे अखितो (वय 84) पहिलेच सम्राट आहेत. ते एप्रिल 2019 मध्ये पदत्याग करणार आहेत.
त्यांच्यानंतर, अखितो यांचा मोठा मुलगा 57 वर्षीय युवराज नारुहितो हे राजेपदावर येतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)