पाकिस्तान : चिमुकलीच्या बलात्कार आणि खुनानंतर देशभर उद्रेक

झैनब

फोटो स्रोत, BBC URDU

    • Author, हुमैरा कंवल
    • Role, बीबीसी उर्दू, पाकिस्तान

पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी भरदिवसा झैनब या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपीने तिचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला होता.

या आरोपीचा शोध घेण्यासाठी 200 पेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असं पाकिस्तानातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण या घटनेनंतर कसूरमध्ये सुरू झालेली प्रदर्शनं पूर्ण पाकिस्तानात पसरत चालली आहेत.

सोशल मीडियावर सगळीकडे या घटनेविरोधात संताप व्यक्त होत केला जात आहे. दु:ख व्यक्त करताना मुलीचे वडील म्हणाले, "पूर्ण जग संपल्यासारखं वाटतंय.... माझ्याकडं काही शब्द नाहीत."

दोन वर्षात 12 मुलांच्या हत्या

गेल्या दोन वर्षांत अशा 12 घटना घडल्याचं कसूरच्या पोलिसांनी सांगितलं. यापैकी पाच घटनांमागे एकाच संशयिताचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला शोधण्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आता पर्यंत 90 संशियितांच्या DNA चाचण्या करण्यात आल्या आहेत.

स्थानिक न्यूज चॅनल 'डॉन न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी प्रदर्शनकर्त्यांवर गोळीबारात केला आहे.

'पोलिसांचा निष्काळजीपणा'

झैनबचे वडील अमीन अंसारी म्हणाले की, "प्रदर्शनकर्त्यांनी केलेल्या जाळपोळीचं समर्थन करत नाहीत. पण त्यांचा संताप मी समजू शकतो."

ते पुढे म्हणाले, "CCTVचं फुटेज मिळताच पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती तर आरोपीला लगेच पकडण्यात यश आलं असतं."

दरम्यान, स्थानिक नेत्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन दिलं आहे.

झैनबचे वडील

फोटो स्रोत, BBC URDU

फोटो कॅप्शन, पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती तर आरोपीला लगेच पकडण्यात यश आलं असतं, असं झैनबच्या वडील म्हणणं आहे.

पाकिस्तानात लोक सतत पोलीस आणि सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. गुरुवारी प्रदर्शनकर्त्यांनी सरकारी इमारती, कार आणि एक स्थानिक नेत्याच्या कार्यालयाला आग लावण्यात आली.

त्यांचं म्हणणं आहे की लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यात पोलिसांनी कोणतीही पाउलं उचलली नाहीत.

आरोपीला पकडण्यासाठी 1 कोटीचं बक्षीस

स्थानिक पोलीस प्रवक्त्यानं AFP वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "जवळजवळ 1000 लोक रस्त्यावर उतरले आहेत. ते सरकारी हॉस्पिटल, पोलीस स्थानक, आयुक्तालयांवर दगडफेक केली जात आहे."

पाकिस्तान

फोटो स्रोत, BBC URDU

फोटो कॅप्शन, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोनजण मृत्युमुखी पडले.

ते पुढं म्हणाले की, "अधिक पोलिसफाटा तैनात करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे."

बुधवारी एका जमावाने स्थानिक पोलीस कार्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण मृत्युमुखी पडले.

पंजाब सरकारने झैनबच्या आरोपीला पकडण्यात मदत करणाऱ्याला 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 30 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

प्रसार माध्यमांमध्येही उद्रेक

पाकिस्तानमध्ये उडालेला उद्रेक प्रसार माध्यमांमध्येही पाहण्यात आला. समा टीव्हीच्या बातमीदार किरन नाझ यांनी आपल्या मुलीला न्यूजरूमध्ये घेऊन आल्या आणि या घटनेचा निषेध नोंदवला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बातमीची सुरुवात करताना त्या म्हणाल्या, "आज मी किरन नाझ नाही, तर मी एक आई आहे आणि म्हणून आज मी माझ्या मुलीसोबत इथे ठिकाणी बसली आहे."

झैनबचा संदर्भ देऊन त्या म्हणाल्या की, "ते म्हणतात ना, की सगळ्यांत छोटी शवपेटीच सर्वांत जड असते. आज पाकिस्तानातला पूर्ण समाज या शवपेटीच्या ओझ्याखाली दबला आहे."

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)