You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदी अरेबिया : आंदोलन करणाऱ्या 11 राजकुमारांना अटक
सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधल्या राजवाड्याबाहेर आंदोलन करणाऱ्या 11 राजकुमारांना प्रशासनानं अटक केली आहे.
सरकारी तिजोरीतून राजघराण्याचं वीजबिल आणि पाणीबिल भरण्यास लावण्यात आलेल्या बंदीचा विरोध हे राजकुमार करत होते. याचा निषेध करण्यासाठीच ते आंदोलन करत होते.
अटक करण्यात आलेल्या राजकुमारांची नावं अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत.
राजघराण्यातल्या व्यक्ती आता त्यांची बिलं स्वतःच भरतील असा निर्णय सौदी सरकारनं घेतला आहे.
सौदी सरकारनं सार्वजनिक खर्चांमध्ये कपात केली असून अनेक अनुदानं सुद्धा बंद केली आहेत.
सौदी सरकारनं नवीन वर्षापासून स्थानिक बाजारपेठेत पेट्रोल उत्पादनांचे दर दुप्पटीनं वाढवलेत. तसंच 5 टक्के वस्तू व सेवा करही लागू केला आहे.
राजकुमारांनी केलल्या आंदोलनाची बातमी सर्वातआधी एका सौदी वेबसाइटवर प्रसिद्ध झाली होती.
रॉयटर्स वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या महाभियोक्त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राजकुमारांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या राजकुमारांना एका अतीसुरक्षीत जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. देशात कायद्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नसल्याचं महाभियोक्तांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सौदी अरेबियामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून डझनभर राजकुमारांना अटक करण्यात आली होती. यात काही माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)