सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीत निळया डागांना सुटी

मानवी रक्ताचा रंग कसा असतो? लाल! हे उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे. मग सॅनिटरी पॅडच्या जाहिरातींमध्ये रक्ताचा लाल रंग न दाखवता निळ्या रंगाचा डाग का दाखवतात?

समाजात मासिक पाळीबद्दल खुलेपणा आणि सहजता नसल्यानं असं होत असेल. पण आता असं होणार नाही. बॉडीफॉर्म या ब्रिटनमधल्या ब्रँडनं जाहिरातींमध्ये सॅनिटरी पॅडवर निळ्या रंगाच्या जागी लाल रंगाचे डाग दाखवले आहेत.

बॉडीफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या 'एसीटी'नं म्हटलं आहे की "मासिक पाळी हा विषय चारचौघांत न बोलण्याचा विषय समजला जातो. आम्हाला या समजुतींना आव्हान द्यायचं आहे."

बॉडीफॉर्मच्या #ब्लडनॉर्मल या जाहिरातीमध्ये अनेक साचेबद्ध समजुतींना छेद देण्यात आला आहे.

अंघोळ करणाऱ्या एका महिलेच्या पायांवर रक्त ओघळत असल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तसंच एका पुरुषाला सॅनिटरी पॅड खरेदी करताना दाखवण्यात आलं आहे.

2016च्या जाहिरातीत या कंपनीनं काही महिला खेळाडूंना बाईक चालवताना, बॉक्सिंग करताना आणि धावताना चिखल आणि रक्तात माखलेलं दाखवल होतं. या जाहिरातींचा पुढचा भाग म्हणजे, आताची जाहिरात आहे.

'रक्त आम्हाला थांबवू शकत नाही' या पंचलाईनने ही जाहिरात टीव्हीवर दाखवली जात आहे.

सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया

सॅनिटरी ब्रॅंड जाहिरातीत सर्वसाधारणपणे पॅड किती ओलावा शोषू शकतो, हे दाखवण्यासाठी रक्ताच्या जागी निळा डाग दाखवतात.

बॉडीफॉर्मच्या लाल डाग असलेल्या जाहिरातींना सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.

तांजा ग्रुबना लिहितात, "आम्हाला असं वाटतं की, सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानले जाणारे विषय जास्तीजास्त लोकांनी पाहिलं की ते विषय सामान्य होतात."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)