अमेरिका : अंदाधुंद गोळीबाराचा काळा इतिहास

लास वेगास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लास वेगास मध्ये काँसर्टदरम्यान झाला हल्ला

अमेरिकेत लास वेगास येथे म्युझिक फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोळीबारात कमीत कमी 59 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.

स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, 64 वर्षीय स्टीफन पॅडक नामक व्यक्तीने मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून अंदाधुंद गोळीबार केला.

पोलिसांच्या मते संशयित हल्लेखोर स्थानिक होता. हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातलं. अमेरिकेच्या इतिहासातील हा सगळ्यात भयावह गोळीबार आहे.

जून 2016: ऑरलॅंडो नाईट क्लब मध्ये गोळीबार

अमेरिकेच्या फ्लोरिडामधील ऑरलॅंडो इथे एका समलैंगिकांच्या नाईट क्लब मध्ये 12 जून 2016 रोजी गोळीबार झाला. पल्स ऑरलँडो हा शहरातील सगळ्यात मोठ्या नाईट क्लब्सपैकी एक आहे.

या हल्ल्यात 49 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

एप्रिल 2007- व्हर्जिनिया टेक हल्ला

अमेरिकेतल्या प्रसिद्ध व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीत झालेल्या हल्ल्यात व्हर्जिनिया नरसंहार म्हणतात. हा हल्ला 16 एप्रिल 2007 साली युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग बिल्डिंगमध्ये झाला.

या हल्ल्यात 32 लोक मारले गेले. पोलिसांनी हल्लेखोरांला ठार केलं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हल्ल्यानंतर सांगितलं की, अमेरिकेला प्रचंड धक्का बसला आहे आणि आम्ही दु:खात आहोत.

लास वेगास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हल्ल्याची सुचना मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

अमेरिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीही कधी हल्लेखोर बनले होते.

डिसेंबर 2012- कनेक्टिकट हल्ला

अमेरिकेतील कनेक्टिकट येथे एका शाळेत 14 डिसेंबर 2012 च्या सकाळी एक व्यक्तीने गोळीबार केला.

अॅडम लान्झा असे या 20 वर्षीय हल्लेखोराचं नाव होतं. शाळेत गोळीबार करण्याआधी त्याने आपल्या आईचीसुद्धा हत्या केली होती. हल्ल्यात 20 मुलं आणि 6 व्यक्तींसकट 27 लोकांचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर 1991 किलीन हल्ला

अमेरिकेतीस टेक्सासच्या किलीन भागातील लुबीज कॅफेटेरियात एका ट्रकच्या सहाय्याने अनेक लोकांना चिरडलं आणि गोळीबार केला. जॉर्ड हेनॉर्ड नामक व्यक्तीने या हल्ल्यात 23 जणांचा जीव घेतला आणि स्वत:ला संपवलं.

डिसेंबर 2015- सॅन बर्नडिनो हल्ला

कॅलिफोर्नियाच्या इनलँड रिजनल सेंटरवर बाँब हल्ला करून मोठ्या संख्येनं हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 2 डिसेंबर 2015 ला झालेल्या हल्ल्यात 14 लोकांचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या दिवशी दोन पैकी एका हल्लेखोरानी स्वत:ला इस्लामिक स्टेटशी निगडीत असल्याचा दावा केला होता.

लास वेगास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लास वेगासच्या हल्ल्यादरम्यान निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण

गोळीबाराची जबाबदारी कुणा अतिरेकी संघटनांनी घेतल्याचाही इतिहास अमेरिकेत दिसतो.

3 एप्रिल 2009- बिंघमटनच्या इमिग्रेशन सेंटरवर हल्ला

न्यूयॉर्कच्या बिंघमटनच्या सिव्हिक इमिग्रेशन सेंटरवर झालेल्या हल्ल्यात 13 लोक मृत्युमुखी पडले. 3 एप्रिल 2009 रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने घेतली होती. हल्ल्यात 40 लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले.

एप्रिल 1999 कोलंबाईन हायस्कूल हल्ला

कोलोरॅडो येथील कोलंबाईन हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात कमीत कमी 13 लोकांचा मृत्यू झाला. 20 एप्रिल 1999 झालेल्या हल्ल्यात ऑटोमॅटिक गनचा वापर केला होता. नंतर दोन्ही हल्लेखोरांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांचे मृतदेह ग्रंथालयात मिळाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)