दहशत, भीती आणि धावाधाव : लास वेगासमधली काळरात्र

लास वेगासच्या सनसेट स्ट्रीप भागातील मंडाले बे हॉटेल परिसरात हा गोळीबार झाला आहे. स्टीफन पॅडक नावाच्या 64 वर्षीय इसमानं हा हल्ला केला आहे.

लास वेगास गोळीबार

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, लास वेगासमध्ये एका काँसर्टदरम्यान झालेल्या गोळीबारात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गोळीबार सुरू असताना भेदरलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
लास वेगास गोळीबार

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातांना नागरिक.
लास वेगास गोळीबारानंतरचा पोलीस बंदोबस्त

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, हल्ल्यानंतर तिथं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलिसांनी चारही बाजूंनी वेढा घातला होता.
लास वेगास गोळीबारानंतरची स्थिती

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, हल्ल्यानंतर नागरिकांनी पुढाकार घेऊन एकमेकांना मदत केली.
लास वेगास गोळीबारानंतर बचावासाठी नागरिकांनी मिळेल त्या जागी धाव घेतली.

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, या काँसर्टसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गोळीबारानंतर मोठी धावपळ उडाली.