You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Budget 2023: 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नात करातून सवलत, निर्मला सीतारामन यांची घोषणा
देशात 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नात सवलत असेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
आयकराची ही मर्यादा देशात आधी 5 लाख इतकी होती. आता ती वाढवून 7 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे.
या मर्यादेच्या वर उत्पन्न असलेल्या लोकांसाठीही नव्या करप्रणालीची घोषणा यावेळी करण्यात आली.
वैयक्तिक आयकर अंतर्गत पाच घोषणा
- सध्या लोक वार्षिक पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर नाही, ही पातळी सात लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
- नेक्स्ट जनरेशन टॅक्स फॉर्म जारी केला जाईल. सुलभ कर भरण्यासाठी नेक्स्ट जनरेशन टॅक्स फॉर्म जारी केला जाईल.
- 31 मार्च 2024 पर्यंत सहकार क्षेत्रात काम सुरू करणाऱ्या नवीन कंपन्यांना 15 टक्के सवलत दिली जाईल.
कशी असेल आयकरची रचना
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करासंदर्भात नवीन संरचना जाहीर केली. नव्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या 5 पर्यंत कम करण्यात आली आहे. त्यानुसार 3 लाखांपर्यंत - कोणताही कर नाही
3 ते 6 लाख - 5 टक्के
6 ते 9 लाख - 10 टक्के
9 ते 12 लाख - 15 टक्के
12 ते 15 लाख - 20 टक्के
15 लाखांहून जास्त - 30 टक्के
भारतीय रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींचा निधी
- भारतीय रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,
- हा आतापर्यंतचा सर्वात मोठी निधीवाटप आहे. यापूर्वी 2013-14 मध्ये केलेल्या वाटपापेक्षा हा 9 पट निधी असणार आहे.
- पीएम आवास योजनेत 66% वाढ करण्यात येणार असून 79 हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
- राज्य सरकारांना 15 वर्षांसाठी दिले जाणारे बिनव्याजी कर्ज आणखी एक वर्षासाठी वाढवले जाईल.
- आणखी 50 विमानतळांजवळ हेलिपॅड बांधले जातील किंवा त्यांचे पुनरुज्जीवन केले जाईल.
- तसंच बंदरांचीही बांधणी करण्यात येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)