सोनाली फोगाट मृत्यू : ‘ड्रग्ज, बलात्कार आणि CCTV फुटेज,’ गोवा पोलिसांचा मोठा खुलासा

फोटो स्रोत, FACEBOOK/SONALI PHOGAT
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी आता नवीन खुलासे केले आहेत. याप्रकरणी सुधीर सागंवान आणि सुखविंदर सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. यासंबंधी एएनआय या वृत्तसंस्थेने सविस्तर वृत्त दिलं आहे.
सोनाली यांचा मृत्यू संशयास्पद असून यामागे मोठं कटकारस्थान असल्याचा दावा सोनालीच्या भावाने केला होता. या प्रकरणी सोनालीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोवा पोलिसांनी दोघांना अटक केलीय.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गोवा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांच्यासोबत आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसत होते. या दोघांनीही सोनालीला जबरदस्तीने काही तरी पाजण्याचा प्रयत्न केला, असंही गोवा पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केल्यानंतर आरोपींनी सोनाली फोगाट यांना ड्रग्ज दिल्याचे कबूल केलं आहे.
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात एकूण चार जणांना अटक
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. गोवा पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली.
त्यामुळे या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता चारवर गेली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी एक आरोपा हा अंजुना येथील रेस्टॉरंटचा मालक आहे. तर एका व्यक्तीची ओळख ड्रग पेडलर दत्तप्रसाद गांवकर अशी पटवण्यात आली आहे.
दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आलं आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस योग्य दिशेने करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.
गोवा पोलिसांनी याबाबत पुढील घटनाक्रम सांगितला..
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोव्यातल्या हॉटेलमध्ये पार्टीदरम्यान, सुधीर सांगवान आणि त्यांचा साथीदार आणि सोनाली हे तिघे दिसतात.
या फुटेजमध्ये सोनाली यांना जबरदस्तीने बाटलीतून एक ड्रिंक देण्यात आल्याचं दिसलं. सुधीर सांगवान याने पोलिसांच्या चौकशीत, त्यांना ड्रिंक्समध्ये ड्रग्स दिल्याचं कबूल केलंय.
या दोन्ही आरोपींनी नॉर्थ गोव्याच्या अंजुना येथील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये सोनाली यांना ड्रग्स दिलं. सोनाली यांनी हे ड्रग्ज घेताच त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. तेव्हा संशयित आरोपींनी त्यांना सांभाळलं. जेव्हा सोनाली स्वत:ला सांभाळू शकत नव्हत्या तेव्हा दोघे त्यांना बाथरुमच्या दिशेने घेऊन जाताना दिसत आहेत.
पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, पुढे या दोघांनीही सोनाली यांना नॉर्थ गोव्यातील अंजुना येथील सेंट एंथनी रुग्णलायात हलवलं. मात्र रुग्णालयात दाखल करताच सोनाली यांना मृत घोषित करण्यात आलं.
आरोपींनी सोनाली फोगट यांना ड्रिंक्समधून काहीतरी प्यायला दिल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच समजेल, असं ही गोवा पोलिसांनी म्हटलंय.
प्राथमिक चौकशीनुसार, सोनाली यांच्या हत्येसाठी हे दोन्ही आरोपी जबाबदार असल्याचं दिसून येतंय, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
सोनाली यांच्या शरीरावर काही जखमा दिसून आल्या आहेत. मात्र या जखमा खोलवर नसल्याचंही गोवा पोलिसांनी सांगितलंय.
सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आरोपींवर केला जातोय. तसंच आरोपींनी सोनाली फोगट यांची मालमत्ता, आर्थिक संपत्ती हडपणं तसंच त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने हत्या केल्याचा आरोप फोगाट यांच्या भावाने केलाय.
दरम्यान, सोनाली फोगाट यांच्यावर त्यांच्या मूळ गावी हिस्सार येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट...
सोनाली फोगाट यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील त्यांची शेवटची पोस्ट सध्या चर्चेत आलीय. सोनाली फोगाट यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हीडिओ पोस्ट केला असून, या व्हीडिओला मोहम्मद रफींचं गाणं बॅकग्राऊंडला आहे.
'रुक से जरा नकाब तो हटा दो मेरे हुजूर' हे मोहम्मद रफींचं गाणं आणि त्यावर स्वत:चा व्हीडिओ अशी पोस्ट सोनाली फोगाट यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट रात्री शेअर केलीय. म्हणजे, त्यांच्या निधनाच्या अगदी काही तासांपूर्वीची आहे.
तसंच, ट्विटर आणि फेसबुकवर त्यांनी आपला प्रोफाईल फोटोही काही तासांपूर्वीच बदलला होता.
सोनाली फोगाट यांचा अल्पपरिचय
सोनाली फोगाट यांनी 2006 मध्ये निवेदिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. हिसार दूरदर्शनसाठी त्या निवेदिकेचं काम करत होत्या.
2008 साली त्यांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं आणि तेव्हापासून त्या सक्रीय राजकारण उतरल्या.

फोटो स्रोत, Facebook
पंजाबी आणि हरियाणवी सिनेमांमध्ये काम, तसंच म्युझिक व्हीडिओही त्यांनी केले आहेत.
बिग बॉसच्या 14 व्या हंगामात सोनाली फोगाट स्पर्धक होत्या. बिग बॉसच्या घरात असताना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना सांगितल्या होत्या.
सोनाली फोगाट टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांचे लाखोंच्या पटीत फॉलोअर्सही होते. मात्र, गलवानच्या घटनेनंतर भारत सरकारनं टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर सोनाली फोगाट यांचंही अकाऊंट बंद झालं. त्यानंतर सोनाली फोगाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आदमपूर निवडणुकीत पराभव
सोनाली फोगाट यांना भाजपनं हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली तिकीट दिलं होतं. काँग्रेसचे उमेदवार कुलदीप बिश्नोई यांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव केला होता. कुलदीप हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र होत. कुलदीप बिश्नोईंनीही आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

फोटो स्रोत, ANI
या निवडणुकीतल्या पराभवानंतर सोनाली फोगाट यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्या एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत होत्या. या व्हीडिओतली पीडित व्यक्ती हिस्सारच्या धान्य बाजारातला अधिकारी होता. सोनाली फोगाट यांनी या बाजाराशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी तिथं गेल्या असताना हा प्रकार घडला. त्यावेळी सोनाली फोगाट यांच्यावर बरीच टीका झाली होती.
दिग्गजांकडून श्रद्धांजली
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोनाली फोगाट यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "भाजप नेत्या श्रीमती सोनाली फोगाट यांच्या आकस्मिक निधनाची अत्यंत दु:खद बातमी कळली. ईश्वरानं दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्यावं. शोकाकूळ कुटुंबीयांना असीम दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भाजपचे नेते कुलदीप बिश्नोई यांनीही सोनाली फोगाट यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
"सोनाली फोगाट यांच्या आकस्मिक निधनाची माहिती अत्यंत दु:खद आहे. त्या अत्यंत मनमिळाऊ आणि उत्तम कलाकार होत्या. परमपिता परमात्मांनी त्यांना आपल्या चरणी स्थान द्यावं आणि कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळवो. ओम शांती"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)