टी. राजा सिंह : प्रेषित मोहम्मदांबाबत वादग्रस्त विधान करणारा भाजप आमदार कोण आहे?

फोटो स्रोत, SUDHEER KALANGI
भाजपचे तेलंगाणातील आमदार टी. राजा सिंह यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजपने त्यांचे निलंबन केले आहे. याआधी तेंलगाणा पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
भाजपने टी. राजा यांना नोटीस दिली आहे, तुमचे निलंबन का करण्यात येऊ नये याबद्दल कारणे दाखवा नोटीस टी. राजा सिंह यांना बजावली आहे. पक्षाने त्यांना दहा दिवसांचा अवधी दिला आहे.
कॉमेडियन मुन्नवर फारूकीचा हैदराबादमध्ये कॉमेडी शो होता. त्याला टी. राजा सिंह यांनी विरोध केला. मुन्नवर फारूकीने हिंदू देवी देवतांची टिंगल उडवली त्यामुळे त्याचा शो होऊ देऊ नये असे राजा सिंह यांचे म्हणणे होते.
गोशामहल येथील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी काही वक्तव्यं केली. त्यावरून वादाला तोंड फुटले. सोमवारी रात्री हैदराबाद येथील मुस्लिमांनी राजा सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती.
चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषेचा वापर केला म्हणून हैदराबाद पोलिसांनी राजा सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अटकेनंतर राजा सिंह यांना बोल्लाराम पोलीस स्थानकात नेण्यात आलं.
ओवैसी यांनी व्यक्त केला निषेध
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत भाजपचा निषेध केला आहे.

फोटो स्रोत, @Asaduddinowaisi
भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी सातत्याने मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधातील विधान करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याआधी नुपूर शर्मांनी देखील असे विधान केले होते याची आठवण ओवैसी यांनी करून दिली.
या विषयावर ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले "भाजप हे मुद्दामहून करत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी त्यांच्या मनातील राग यातून दिसून येतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्याप्रमाणे मुन्नवर फारूकीने हिंदू देवतांची खिल्ली उडवली त्याच प्रकारे हा देखील कॉमेडीचाच प्रकार असल्याचे टी. राजा सिंह यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत टी. राजा सिंह?
टी. राजा गोशामहल मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात येण्याआधी ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.
२०१४ च्या निवडणुकांआधी टी. राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते तेलुगू देसम पक्षात होते. २००९ मध्ये ते तेलुगू देसमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गोरक्षण अभियानासाठी ते हैद्राबाद आणि परिसरात ओळखले जातात.
तेलंगणात २०१८ च्या निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची हवा होती, त्यावेळी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, त्यातही तेलंगणा भाजपचे 5 आमदार निवडून आले होते त्यापैकी एक टी. राजा होते.
टी. राजा यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी ७५ पेक्षा जास्त तक्रारी दाखल आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.
टी. राजा यांची वादग्रस्त वक्तव्ये
टी. राजा सिंह यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहे.
- 2021 मध्ये टी. राजा म्हणाले होते की "जे लोक बीफ खातात त्यांनी राम मंदिरासाठी देगणी देऊ केल्यास ती घेऊ नये. अशा लोकांकडून एक रुपया देखील स्वीकारू नये," असे म्हटले होते.

फोटो स्रोत, facebook/Rajasingh
- "जे लोक वंदे मातरम म्हणणार नाहीत त्यांना या देशात राहण्याचा अधिकार देखील नाही," असे देखील त्यांनी म्हटले होते.
- "जुने हैदराबाद हे मिनी पाकिस्तान आहे," असे देखील वक्तव्य केले होते. आणि जर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी छापे मारले तर त्यांना खूप सारे बॉम्ब आणि हत्यारे सापडतील असे विधान त्यांनी केले होते.
- पद्मावत चित्रपटावेळी देखील टी. राजांनी वक्तव्य केले होते, जर या चित्रपटात हिंदूची प्रतिमा खराब दाखवण्यात आली असेल तर आम्ही त्याचे प्रदर्शन थांबवू असे त्यांनी म्हटले होते.
नुपूर शर्मांनी केले होते प्रेषितांबद्दल वक्तव्य
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचे पडसाद जगभरात उमटले होते. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
नुपूर शर्मा यांना देशाच्या सुप्रीम कोर्टानेही फटकारलं होतं. नुपूर यांनी टीव्हीवरून देशाची माफी मागावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.
यावेळी कोर्टाने म्हटलं होतं, "नुपूर शर्मांची जीभ घसरली. त्याचा परिणाम म्हणून देश पेटला. शर्मा यांच्या वक्तव्यामुळेच उदयपूर हत्या प्रकरणासारखी दुर्दैवी घटना घडली आहे."
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी एक उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली होती आणि हा वाद पेटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूर दौऱ्यापूर्वी याचे पडसाद कानपूरमध्ये उमटले आणि दोन गटांमध्ये या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. मात्र, हा वाद भारतातच न थांबता देशाच्या सीमेपलीकडे देखील गेला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








