'या' वस्तूंवर 5% जीएसटी वाढ, आता कोणकोणत्या गोष्टी महागणार?

महागाईचा फटका सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता अजून एक मोठा फटका 18 जुलैपासून बसणार आहे. कारण, 18 जुलैपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये (GST) वाढ झालीय.
जीएसटी काऊंसिलने (GST Council) 18 जुलैपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार, गहू यांसारखे पदार्थ महागणार आहेत. तर आरोग्य आणि शिक्षणसेवा देखील महागणार आहेत.
रोजच्या गरजांच्या या वस्तूंसाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
'या' वस्तूंवर 5% जीएसटी
आजपासून पॅकेट बंद सामानांवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. याआधी पॅकेट बंद सामानांवर फक्त 5 टक्के जीएसटी लागू होता.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय नारळ पाणी आणी फुटवेअरच्या कच्च्या मालावरही 12 टक्के जीएसटी लागणार आहे.
मासे, दही, पनीर, लस्सी, मध, मखाना, सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता पाच टक्के जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.
आरोग्यसेवा महागणार
रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste ) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शैक्षणिक वस्तू महागणार
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.
दरम्यान, अनपॅक केलेले, लेबल नसलेले आणि ब्रँड नसलेल्या वस्तूंना जीएसटीमधून सूट मिळेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








