भारत सरकारविरोधात ट्विटरची कोर्टात धाव, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
भारत सरकारने ट्विटरवर काही अकाऊंट ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाविरुद्ध ट्विटरने आता कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
जून महिन्यात केंद्र सरकारने हे आदेश काढले होते. या आदेशांचं पालन न केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा सरकारने दिला होता. भारतात ट्विटरचे अंदाजे 2.4 कोटी वापरकर्ते आहेत.
ही याचिका दाखल केल्यानंतर भारताचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट केलंय की, सगळ्या परदेशी कंपन्यांना या आदेशांचं पालन करावंच लागेल.
जूनमध्ये हा आदेश काढला तेव्हा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची ही शेवटची संधी आहे, असं ट्विटरला ठणकावून सांगितलं होतं.
ज्या मजकुरामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतो ते वगळण्याचा आदेश केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत देऊ शकतं.
या आदेशाचं पालन केलं नाही तर गुन्हेगारी खटला दाखल होऊ शकतो, अशी भीती वाटल्यानेच ट्विटर कोर्टात गेलं असं सरकारचं मत आहे.
ट्विटरच्या मते हे आदेश कायद्यात बसणारे नाहीत. तसंच या आदेशात सरकारकडे असलेल्या अतिरिक्त शक्तीचं द्योतक आहे, असं मत ट्विटर ने व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गेल्या एक वर्षांत ट्विटरला अनेक ट्विटस आणि अकाऊंट्स हटवण्याचा आदेश सरकारने दिला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असं सरकारचं म्हणणं होतं. त्यात शेतकरी आंदोलन आणि कोव्हिडची सरकारतर्फे केली गेलेली हातळणी या दोन विषयांवरच्या ट्विट्सचा समावेश होता.
सरकारच्या आदेशानुसार ट्विटरने 250 अकाऊंट ब्लॉक केले होते. त्यात अनेक मासिकं, शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अकाऊंटचा समावेश होता.
मात्र अगदी सहा तासातच ट्विटरने या अकाऊंटवरची बंदी हटवली होती. कारण बंदी घालण्यासाठी कारणं पुरेशी नाहीत, असं ट्विटरचं म्हणणं होतं.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत सरकारने ट्विटरला भारतात व्यापार करण्यास परवानगी दिली होती. मात्र ट्विटरचे अंतर्गत नियम काहीही असले तरी त्यांना भारत सरकारचे नियम पाळावेच लागतील, अशी तंबी दिली होती.
ट्विटरच्या दिल्लीच्या ऑफिसवर छापा टाकताच अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असल्याचं ट्विटरचं मत होतं.
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या 69A कलमानुसार सरकारला अशा प्रकारची बंदी घालण्याचा अधिकार आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यातलं कलम 69 A काय आहे?
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या 69 अ कलमानुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह मजकूर ब्लॉक करण्याचा अधिकार आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला धोका निर्माण होत असेल, भारताच्या किंवा भारतातील राज्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल किंवा शेजारी राष्ट्रांच्या संबंधावर परिणाम होत असेल तर अशा प्रकारच्या मजकुरावर बंदी आणण्याचा अधिकार या कलमानुसार सरकार ला मिळतो.
तसंच ट्विटरवरील मजकुरामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असेल तर अशा मजकुरावर बंदी घालण्याचा किंवा ब्लॉक करण्याचा अधिकार सरकारला आहे.
एकदा ब्लॉकिंग ऑर्डर निघाली की त्याला उत्तर देण्यासाठी ट्विटरला वेळ दिला जातो. मंत्रालयात होणाऱ्या नियमित बैठकांमध्ये ट्विटर त्यांचे आक्षेप सरकारकडे नोंदवू शकते. त्यानंतरच अंतिम ब्लॉकिंग ऑर्डर दिली जाते.
जर हा आदेश मिळूनही ट्विटरने तो मजकूर ब्लॉक केला नाही तर मंत्रालय त्यांना नोटिस जारी करू शकतं. त्यानंतर दंडाची प्रक्रिया सुरू होते. त्यात सात वर्षं तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये आलेल्या कायद्यानुसार ट्विटरच्या Chief Compliance Officer ला ब्लॉकिंग ऑर्डरची अंमलबजावणी केली नाही तर जबाबदार धरण्यात येऊ शकतं. ट्विटरच्या मते हे चिंताजनक आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








