उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्वीट, 'माणूस नशिबाला कर्तृत्व समजू लागतो तेव्हा...'

"एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो," असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी हे विधान करताना कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. पण उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर केलेल्या पार्श्वभूमीवर हा त्यांनाच टोला तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात गेल्या दहा दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. पण राज ठाकरे यादरम्यान शांत होते. त्यांनी यादरम्यान कोणतीच प्रतिक्रिया आपल्या बाजून दिली नव्हती.

यादरम्यान त्यांच्यावर उपचारही सुरू होते. पण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही बरेच दिवस राज ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं.

पण, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अत्यंत कमी शब्दात पण सूचक असं विधान राज ठाकरे यांनी या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)