पोलीस भरती परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, वाचा कशी होते परीक्षा

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्याच्या तक्रारी लक्षात घेऊन हा अर्ज भरण्याची मुदत वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,. "पोलीस भरतीसाठी आमच्याकडे 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. पण अर्ज भरण्याबाबत काही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवली आहे. 75 हजार पदं भरण्याबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. प्रत्येक विभागाला पद भरतीबाबत निर्णय द्यावा लागेल."
पोलीस शिपाई भरती पद्धतीतील 7 बदल
- पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी आधी आणि मग लेखी परीक्षा होईल. शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.
- राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलिस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे.
- शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
- लेखी चाचणी ही एकूण 100 गुणांची होईल.
- लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील.
- लेखी परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल आणि लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल.
- लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्यात येईल.
तयारी करणारे उमेदवार काय म्हणतात?
बुलडाणा जिल्ह्यातील 27 वर्षीय सतीश पवार गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करतोय.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
पोलीस शिपाई भरती परीक्षेतील नवीन नियमांविषयी विचारल्यावर तो सांगतो, "आता मैदानी चाचणी आधी होणार आहे. त्यामुळे ही बाब ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे. कारण याआधी लेखी परीक्षा आधी व्हायची. या परीक्षेसाठी पीएसआय किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अर्ज करायचे आणि पास व्हायचे. त्यामुळे मग खेड्यातली मुलं भरती प्रक्रियेतून बाहेर पडायची.

फोटो स्रोत, Getty Images
"आता या नव्या नियमामुळे इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मुलं शिपाई पदाच्या भरतीसाठी अर्ज करणार नाहीत. याशिवाय खेड्यातल्या मुलांचं ग्राऊंड चांगलं असतं. यामुळे आम्हाला याचा फायदा होईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








