एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले आमदार कोण आहेत?

फोटो स्रोत, UGC
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
"आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही", असं एकनाथ शिंदे यांनी सुरत विमानतळावर सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही 40 आमदार आहोत, अजून 10 आमदार यामध्ये सहभागी होतील."
एकनाथ शिंदे आमचे सहकारी आणि मित्र आहेत. अजूनही आम्ही त्यांचे वाट पाहतोय. आम्हाला खात्री आहे की, ते सर्व आमदारांसह परत येतील," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
"आमदारांना परत यायचंय. पण येऊ दिलं जात नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशाप्रकारे राज्य आणू पाहत असेल, तर देशासाठी गंभीर बाब आहे. अमित शाह यांनी यात लक्ष घालून, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री असल्याचे त्यांनी दाखवून द्यावं."
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेमानं मुंबईत यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही राऊत म्हणाले आहेत.
गुवाहाटीला पोहोचलेले आमदार कोण आहेत?
- प्रताप सरनाईक (माजिवडा, ठाणे)
- श्रीनिवास वनगा (पालघर)
- अनिल बाबर (खानापूर)
- नितिन देशमुख (अकोला)
- लता सोनवणे (चोपडा)
- यामिनी जाधव (भायखळा)
- संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
- महेंद्र दळवी (अलिबाग)
- भारत गोगवले (महाड)
- प्रकाश सर्वे (मागाठणे)
- सुहास कांदे (नांदगाव)
- बच्चू कडू , प्रहार पार्टी (अचलपूर)
- नरेन्द्र बोंडेकर, अपक्ष (भंडारा)
- संजय गायकवाड (बुलडाणा)
- संजय रायमूलकर (मेहेकर)
- बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
- रमेश बोरनारे (वैजापूर)
- चिमणराव पाटील (एरंडोल)
- किशोर पाटील (पाचोरा)
- नितीनकुमार तळे (बाळापूर)
- संदीपान बुमरे (पैठण)
- महेंद्र थोरवे (कर्जत)
- शंभूराजे देसाई (पाटण)
- शहाजी पवार
- तानाजी सावंत (परांडा)
- शांताराम मोरे (भिवंडी)
- विश्वनाथ भोईर (कल्याण)
- शहाजी पाटील (सांगोला)
- प्रदीप जैसवाल (औरंगाबाद मध्य)
- किशोर पाटील (जळगाव)
- उदयसिंह राजपूत
- महेश शिंदे
- ज्ञानराज चौगुले (उमरगा)
- राजकुमार पटेल (मेळघाट)
- अब्दुल सत्तार (सिल्लोड)
- प्रकाश अबिटकर (राधानगरी)
- बालाजी किणीकर (अंबरनाथ)
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
याबरोबरच बच्चू कडू यांच्यासारखे काही इतर आमदारही एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)