कंगना राणावत कतार एअरवेजच्या सीईओला आधी मूर्ख म्हणाली आणि मग...

फोटो स्रोत, facebook
कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकर यांचा एक व्हायरल पॅरडी व्हीडिओ खरा मानून अभिनेत्री कंगना राणावतने त्यांना इन्स्टाग्रामवर मूर्ख म्हटलं होतं. पण सत्यता लक्षात आल्यानंतर कंगनाने ती स्टोरी काढून टाकली आहे.
वासुदेव नावाच्या एका ट्वीटर युजरने एक व्हीडिओ प्रसिद्ध करून कतार एअरवेजवर बहिष्कार टाका, अशी मागणी केली होती.
त्याचा तो व्हीडिओ आणि कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकर यांच्या जुन्या मुलाखतीतला एक भाग काढून कुणीतरी एक नवा व्हीडिओ तयार केला आहे.
हा व्हीडिओ असा एडिट केला आहे की, पाहणाऱ्याला अकबर अल बाकर हे वासुदेवच्या बहिष्कारच्या मागणीला उत्तर देत आहेत असं वाटावं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अर्थात, हा व्हीडिओ पाहाणाऱ्याला हेसुद्धा लक्षात येईल की त्यातून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण, अकबर अल बाकर यांचा हा व्हीडिओ खरा मानून अभिनेत्री कंगना राणावतने एक इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांना 'मूर्ख' म्हटलं होतं.

फोटो स्रोत, kanganahot_ranaut
अकबर अल बाकर यांना मूर्ख म्हणत कंगनाने लिहिलं होतं, "तुमच्या सारख्या श्रीमंत लोकांसाठी वासुदेव गरीब आणि कमी महत्त्वाचा असेल पण त्याला त्याचं दुःख आणि निराशा कुठल्याही संदर्भात मांडण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा या दुनियेच्या पुढे आणखी एक दुनिया आहे जिथं आपण सर्व एकसारखेच आहोत."
"सर्व तथाकथित भारतीय जे या गरिबाची थट्टा करत आहेत ते या मोठी लोकसंख्या असलेल्या देशावर एक बोज आहेत," असंही तिने लिहिलं होतं.
पण व्हीडिओबाबतची सत्यता लक्षात येताच कंगनाने तिची ही स्टोरी काढून टाकली आहे.
काय आहे वासुदेवचा तो व्हीडिओ?
या व्हीडिओत वासुदेव म्हणत आहे, "हा तोच कतार आहे ज्याने एम.एफ. हुसैन यांना आश्रय दिला होता. ज्यांनी माता सीता आणि दुर्गादेवीची नग्न चित्र काढली होती. त्यांना कतारने नागरिकता दिली होती. तोच कतार आता नुपूर शर्माच्या मुद्द्यावरून भारताला ज्ञान देत आहे. कतारमध्ये भारतीयांना नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की कतारच्या सामनाचा बहिष्कार करा. कतार एअरलाईन्सचा बहिष्कार करा."

फोटो स्रोत, kanganahot_ranaut
वासुदेवचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरने सध्या त्याचं अकाउंट बंद केलं आहे.
दरम्यान, कंगनाने इस्टाग्रामवर नुपूर शर्मांच्या समर्थनार्थसुद्धा एक पोस्ट टाकली आहे.
कंगनाने लिहिलंय, "नुपूरला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर होणाऱ्या सर्व हल्ल्यांना मी पाहत आहे. जवळपास दररोज ते हिंदू देवतांचा अपमान करतात तेव्हा आम्ही कोर्टात जातो. तुम्हीसुद्धा असंच करा. हे अफगाणिस्तान नाही. आपल्याकडे लोकशाही सरकार आहे. हे सतत विसरणाऱ्या लोकांसाठी आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








