UPSC : एकेकाळी गोळ्या लागून जबडा फुटला, आता 16 व्या प्रयत्नात अधिकारी

गेल्या काही दिवसांपूर्वी युपीएससीचा निकाल लागला. त्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं नेहमीच कौतुक होतं. पण या यादीत असे काही लोक दडले असतात ज्यांची गोष्ट आपल्याला भारावून सोडते. रिंकू राही यांचीही अशीच गोष्ट आहे.
रिंकू राही यांनी यावर्षीच्या परीक्षेत 683 वा क्रमांक मिळवला आहे. ते उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये राहतात. ते सध्या उत्तर प्रदेश शासनात समाज कल्याण अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे नीट पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्याची डावी बाजू वाकडी दिसते कारण त्यांना तिथे गोळ्या लागल्या होत्या.
रिंकू राही यांची 2004 मध्ये उत्तर प्रदेश शासनात समाज कल्याण अधिकारी म्हणून नेमणूक झाली. रिंकू यांची परिस्थिती बेताची होती. त्यांनी सरकारी शाळेतून शिक्षण घेतलं. नंतर शिष्यवृत्ती घेऊन ते इंजिनिअर झाले होते.
2008 च्या सुमारास मुजफ्फरनगर जिल्ह्यात ते समाज कल्याण अधिकारी होते. तिथे काम करताना स्कॉलरशिप, पेन्शन योजना अशा सरकारी योजनांमधील घोटाळा त्यांच्या लक्षात आला. त्याविरोधात त्यांनी पुरावे गोळा केले. तिथल्या समाजकंटकांच्या ते लक्षात आलं. हा घोटाळा 100 कोटींचा होता.
"अक्षरश: रक्त शोषण्याचा धंदा तेव्हा चालू होता. त्यातच निवडणुका होता त्यामुळे माझी ते बदली करू शकले नाही. मग जे सगळ्यात सोपं होतं तेच त्यांनी केलं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला."
"एक दिवशी मी सकाळी बॅडमिंटन खेळत होतो. तेव्हा दोन लोक आले आणि त्यांनी माझ्यावर गोळीबार केला. ज्यांच्याबरोबर मी बॅडमिंटन खेळत होतो. ते ही त्यात सहभागी होते. माझ्यावर सात राऊंड फायर झाले. त्यात चार गोळ्या मला लागल्या आणि बेशुद्ध झालो."

"या घटनेने माझा जबडा फाटला, माझा एक डोळा गेला, ऐकायला ही त्रास होतो. मात्र मी हिंमत हारलो नाही." राही बीबीसीशी बोलत होते.
या हल्लेखोरांना 10 वर्षांची शिक्षा झाली. ते आजही लढा लढत आहेत
दुसरीकडे त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालूच ठेवला. इतक्या भीषण घटनेनंतर त्यांच्यातला प्रामाणिकपणा कायम राहिला. त्यांनी अधिक त्वेषाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि या वर्षी अखेर तब्बल सोळाव्या प्रयत्नानंतर त्यांना यश मिळालं."
उत्तर प्रदेश सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे ते आता संचालक आहेत. लवकरच ते केंद्र शासनाच्या सेवेत रुजू होतील.
हा प्रवास कठीण होता. पण आता मला आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








