राष्ट्रपतींच्या कोणत्या कृतीने पंतप्रधान मोदींना 'शरमल्यासारखं' वाटलं?

फोटो स्रोत, @RASHTRAPATIBHVN
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार 3 जून रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं मूळ गाव असलेल्या उत्तरप्रदेशमधील कानपूरच्या पारौंख गावाला भेट दिली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या भेटीदरम्यान उपस्थित होते.
आपल्या मूळ गावी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी पहिल्यांदाच प्रोटोकॉल मोडतं स्वत: हेलिपॅड गाठलं.
यावर पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रपती कोविंद यांच्या आदरातिथ्यामुळे त्यांना 'सुखद धक्का' बसला असून त्यांना 'लाज' वाटत आहे.
पारौंख येथील सभेत पंतप्रधान म्हणाले, "राष्ट्रपतींना परौंखच्या मातीतून मिळालेल्या मूल्यांचं दर्शन संपूर्ण जगाला घडतं आहे. मी आज एका बाजूला संविधान आणि दुसरीकडे संस्कार पाहिले. आणि आज तर राष्ट्रपतींनी पदाभोवती निर्माण झालेल्या सर्व प्रतिष्ठेतून बाहेर पडून आज मला सुखद धक्का दिलाय. माझ्या स्वागतासाठी ते स्वतः हेलिपॅडवर आले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीचं आपण काम करतोय ना हे लक्षात आल्यावर मला खूप लाज वाटली. त्यांच्या पदाला एक सन्मान आहे, एक ज्येष्ठता प्राप्त झाली आहे."
पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं की, मी राष्ट्रपतींना म्हणालो की आज त्यांनी (राष्ट्रपतींनी) आपल्यावर मोठा अन्याय केलाय.
यावर राष्ट्रपती म्हणाले की, "मी संविधानाच्या सर्व मर्यादा पाळतो, पण कधी कधी संस्कृतीचीही स्वतःची ताकद असते. आज तुम्ही माझ्या गावात आलात. आज मी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आलोय. मी राष्ट्रपती म्हणून नाही तर या गावचा मुलगा म्हणून आलो आहे. या गावाचा नागरिक म्हणून मी तुमचे स्वागत करायला आलोय.
यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, हे आपल्यासमोर एक उदाहरण आहे की, भारतातील एका गावात जन्मलेला गरीबातला गरीब माणूसही राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री बनू शकतो. पण फक्त राजकारणातचं नाही तर प्रत्येक क्षेत्रात कुटुंबशाही आहे. ही कुटुंबशाही प्रतिभावान व्यक्तीला प्रगती करण्यापासून रोखते.
इतर राजकीय पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझी कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक नाराजी नाही. देशात मजबूत विरोधी पक्ष, लोकशाहीला वाहिलेले राजकीय पक्ष असावेत, अशी माझी इच्छा आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते म्हणाले, "राष्ट्रपतींनी त्यांचे वडिलोपार्जित निवासस्थान संमेलन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी दिले. आज ते प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने महिला सक्षमीकरणाला नवं बळ देत आहे."
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या गावांसंबंधीच्या विचारांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे स्वातंत्र्य महात्मा गांधी गावांशी जोडू पाहत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "आपल्या गावांमध्ये सर्वाधिक क्षमता, सर्वोच्च श्रमशक्ती आणि सर्वोच्च समर्पण आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक एका गावाचं सक्षमीकरण करणं आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे."
राष्ट्रपतींनी मानले आभार
आपलं मूळगाव पारौंख येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाले की, आज पंतप्रधान मोदी आमच्या या छोट्या गावात आले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

फोटो स्रोत, @NARENDRAMODI
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, आजपासून माझं गाव आणि मी सदैव तुमचे ऋणी राहू. तुमच्या येण्यानं आमचं गावच नाही तर हा जिल्हा ही धन्य झाला आहे.
राष्ट्रपती पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशच्या जनतेला नेहमीचं असं वाटायचं की, राज्याने देशाला एक नव्हे तर नऊ पंतप्रधान दिले आहेत. पण आज उत्तर प्रदेशच्या जनतेला अभिमान वाटतो की, राज्याकडे पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची जबाबदारी आली आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींना जातं."
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "भारतीय संस्कृतीवर आधारित सर्वसमावेशक, समरसतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी, गरीब, मागास, वंचित घटकांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेबांच्या आदर्शांना पंतप्रधान मोदींनी ज्याप्रकारे कार्यरूप दिलं आहे तो आपल्या प्रत्येकासाठी आदर्श आहे. आणि पंतप्रधान स्वतः एक उदाहरण आहेत.
आपल्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, "मी जेव्हा केव्हा इथं येतो, तेव्हा आवर्जून इथली माती मी माझ्या कपाळाला लावतो. आज मी जो काही आहे, ज्या ठिकाणी आहे, ते सर्व माझ्या हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि मातृभूमीच्या आशीर्वादाच्या बळावर शक्य झालं आहे."
राज्य सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाले की, पारौंख गाव आणि परिसरातील रहिवाशांच्या हितासाठी स्थानिक प्रशासनाने अनेक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कल्याणकारी काम केली. अशा लोकाभिमुख कामांसाठी मी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाचं कौतूक करतो.
राष्ट्रपती-पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कानपूरमध्ये हिंसाचार
शुक्रवारी राष्ट्रपती-पंतप्रधान-राज्याचे मुख्यमंत्री कानपूरच्या जनतेला संबोधित करत होते, त्याचवेळी कानपूरच्या बेकनगंज भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. शुक्रवारच्या नमाजानंतर इथे दोन समुदायांमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
परिस्थिती बघता हिंसाचारग्रस्त भागात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकांवर गँगस्टर आणि एनएसए कायद्यांतर्गत कारवाई होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
कानपूरच्या जिल्हा दंडाधिकारी नेहा शर्मा घटनास्थळी पोहोचल्या, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, दोन्ही गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली होती. आता पोलीस आणि प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
ही घटना नियोजित होती की अचानक घडली, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. मात्र लोकांची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

फोटो स्रोत, @RASHTRAPATIBHVN
कानपूरचे पोलीस आयुक्त विजय शंकर मीणा यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. या 18 जणांविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले होते, "कानपूर शहरातील बेकनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नई रोड परिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोकांनी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. याला दुसऱ्या बाजूच्या लोकांनी विरोध केला. यावरून आपापसात वाद होऊन दगडफेकीची घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी पोहोचले. आवश्यक बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे."
विरोधकांनी साधला निशाणा
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी याप्रकरणी ट्विट केलं होतं.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शहरात असताना देखील पोलिस आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे, भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे, कानपूरमध्ये जी अशांतता पसरली आहे त्यासाठी भाजप नेत्याला अटक करण्यात यावी. आमची विनंती आहे की, सर्वांनी शांतता राखावी."
त्याचवेळी, बसपा सुप्रीमो मायावती यांनी आज, शनिवारी ट्विट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
त्या लिहितात की, "राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या यूपी दौऱ्यादरम्यान, कानपूरमध्ये झालेली दंगल आणि हिंसाचार अत्यंत दुःखद, दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. हा हिंसाचार म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचंही द्योतक आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्थेचा अभाव असताना गुंतवणूक आणि विकास शक्य होईल का? याचा विचार सरकारने करावा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)