Electric Scooters पेटण्याच्या घटना वाढतायेत, यावर कंपन्यांचं काय म्हणणं आहे?

फोटो स्रोत, Ola Electric
- Author, प्रीती गुप्ता आणि बॅन मॉरिस
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी या इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या विशाल कारखान्याच्या मजल्यावर रोबोट शांतपणे फिरत आहेत.
सॉफ्टबँक या जपानी गुंतवणूकदाराच्या पाठिंब्यावर हे स्टार्ट-अप काम करत आहे. एकदा पूर्ण क्षमतेनिशी चालू झाल्यानंतर हा कारखाना जगातील इतर कोणत्याही प्लांटपेक्षा अधिक इलेक्ट्रिक स्कूटर तयार करेल. अशी कंपनीला आशा आहे.
इथे असेंब्ली लाईनचे बरेच काम रोबोटद्वारे केले जाते, जे स्कूटरचे भाग वेगाने वाहतूक करतात आणि त्यांना एकत्र जोडतात.
500 एकरांवर पसरलेल्या या कारखान्याची कदाचित सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याचा आकार नसून तिथल्या कामगारांची संख्या आहे.
सध्या याठिकाणी जवळपास 1,700 ते 1,800 लोक काम करतात, यामध्ये महिलांचाही समावेश आहे. शिफ्ट मॅनेजर, टेस्ट रायडर्स, तंत्रज्ञ आणि प्रशिक्षक म्हणून काम करत असलेल्या अनेकांची ही पहिली नोकरी आहे.
तरीही उत्पादन सुरळीतपणे पार पडत नाही.
ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट 2021 मध्ये रिचार्जेबल बॅटरीसह चालणारी S1 आणि S1-Pro ही पहिली मॉडेल्स लाँच केली. लाँच केल्यानंतर अवघ्या 24 तासांत 1,00,000 ऑर्डर मिळाल्या होत्या.
डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात डिलिव्हरी सुरु झाल्यापासून काही ग्राहकांनी सोशल मीडियावर गाडीच्या तांत्रिक अडचणीबद्दल तक्रार केली. आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीला एका विशिष्ट बॅचमधून 1,441 स्कूटर परत मागवायला भाग पाडले गेले.
पुण्यात 26 मार्च रोजी एका ग्राहकाच्या नवीन गाडीला गाडी उभी केल्यानंतर अचानक आग लागल्याची घटना प्रसिद्ध झाली होती.
कंपनीने रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि प्राथमिक मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की "आगीची घटना ही एक वेगळी घटना होती. परंतु त्या विशिष्ट बॅचमध्ये परत मागवलेल्या सर्व स्कूटरची निदान आणि आरोग्य तपासणी केली जाईल."

फोटो स्रोत, Getty Images
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक भाविश अगरवाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि "या सर्व स्कूटर्सची आमच्या सर्व्हिस इंजिनिअरकडून तपासणी केली जाईल आणि सर्व बॅटरी सिस्टम, थर्मल सिस्टीम तसेच सिक्युरिटी सिस्टीममध्ये योग्य निदान केले जाईल."
बीबीसी न्यूजने याविषयी अधिक माहितीसाठी कंपनीशी संपर्क साधला परंतु त्यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.
गाडीमध्ये आग लागण्याच्या घटना फक्त ओलापुरते मर्यादित न राहता इतर तीन ब्रँडच्या गाडीत आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये भारतातील स्टार्ट-अप असलेल्या ओकिनावा आणि प्युर ईव्ही या ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक वाहनांकडे भारताचा कल
भारतातील प्रवासी आणि सरकार या दोन्हीसाठी गेल्या वर्षी भारतात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आगमन हा एक रोमांचक क्षण होता.
जगातील इतरही बर्याच देशांप्रमाणे भारतही आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येला पेट्रोल आणि डिझेलपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने वळवायचे याचा प्रयत्न करत आहे. निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष गाठण्यासोबत अनेक शेजारी देशांप्रमाणे, भारत देखील वाढत्या महागाईला रोखत आहे.
मोटरिंग पत्रकार पार्थ चरण, ज्यांनी स्वतः याची टेस्टिंग केली आहे, त्यांच्या मते, "ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने स्वतःला इलेक्ट्रिक टू-व्हीलरमधील टेस्ला म्हणून यशस्वीरित्या स्थान मिळवले आहे आहे."
सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून त्यानुसार मार्चमध्ये तेल आयात खर्च कमी करण्यासाठी सरकारने कंपनीला एकूण 20 गिगावॅट-एचपी पॉवर साठवू शकणार्या EV बॅटरी तयार करण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा केली आहे.
भारतातील ईव्ही उत्पादकांना आता ज्या काही समस्या येत आहेत, त्या देशांतर्गत बाजारपेठ आणि प्रकाश नियमनातील सामान्य संशोधनाच्या अभावाशी थेट संबंधित आहेत. याबद्दल ईव्ही बाजारातील सहभागी चिंतित आहेत.
टू व्हीलरसाठी फास्ट चार्जिंग बॅटरी बनवणाऱ्या लॉग नाईन मटेरियलचे संस्थापक अक्षय सिंघल म्हणतात, "आम्ही इतर देशांमध्ये आणि त्यांच्यासाठी बनवलेल्या तंत्रज्ञानावर दीर्घकाळ विसंबून राहिलो आहोत. ते तंत्रज्ञान भारतात लागू होण्याबाबत आम्ही कधीही शंका घेतली नाही. पर्यावरणीय तसेच ऑपरेशनल दृष्टीकोनातून भारताची स्वतःची गतिशीलता आहे."
उष्णतेच्या लाटा आणि पूर सोबत खराब हवामान अशा परिस्थितीमुळे भारताच्या काही भागांमध्ये वाहन निर्मात्यांसाठी बाजारपेठ आव्हानात्मक बनली आहे. हेही ते अधोरेखित करतात.
याशिवाय कठोर नियमनाच्या अभावामुळे उत्पादकांना पुरेशा गुणवत्ता नियंत्रण आणि चाचणीशिवाय उत्पादने बाजारात आणण्याची परवानगी मिळाली आहे. असेही सिंघल यांना वाटते.
इंडियाज फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA), देखील वाढत्या ईव्ही टू व्हीलर मार्केटवर कठोर नियमन करण्याची मागणी करत आहे.

फोटो स्रोत, Krishna Jaiswal
याबाबत "आम्ही कठोर नाही, असा निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे ठरेल." असे मत नीती आयोगाचे सल्लागार सुधेंदू सिन्हा म्हणतात. भारतात जवळपास 37,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी मोजक्याच स्कूटर्सना तांत्रिक समस्या आल्याचे ते म्हणतात.
ते पुढे म्हणतात, "काही घटनांमुळे संपूर्ण उद्योगाला किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला दोष देऊ शकत नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. सुरक्षेला आमचे प्रमुख प्राधान्य आहे आहे."
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने त्यांच्या स्कूटरची 15 मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये विविध भूभागांमध्ये लाखो किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासोबत वाहनाच्या प्रत्येक पैलूसह चाचणी केली गेली आहे. याचा ते नव्याने उल्लेख करतात.
तरीही, स्कूटरच्या आगीमुळे हादरलेल्या कृष्णा जैस्वाल सारख्या ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्याची चढाओढ असेल. तो बीबीसीला एका फोन मुलाखतीत सांगतो, "15 मिनिटांत स्कूटर राख झाली,"
"आम्ही ओलावरचा विश्वास गमावला आहे. माझ्या मित्रांना खरेदी करायची होती, पण आता न करण्याचा निर्णय घेतला आहे," तो म्हणतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








