माधव गोडबोलेंचं निधन

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
डॉ. माधव गोडबोले यांनी 1959 साली भारतीय प्रशासन सेवेत पदार्पण केलं. मार्च 1993 मध्ये भारत सरकारचे ते केंद्रीय गृहसचिव होते. या पदावरूनच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
त्यापूर्वी ते महाराष्ट्रात प्रधान वित्त सचिव, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष आणि ऊर्जा सचिव, उद्योग आयुक्त, तसंच मुख्यमंत्र्यांचे सचिव अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं.
1980 ते 1985 या पाच वर्षात फिलिपाईनच्या मनिला येथील आशियाई विकास बँकेवर प्रतिनियुक्तीवर होते.
केंद्र सरकारच्या सेवेत ते एका दशकाहून अधिक काळ कार्यरत होते.
यशवंतराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री आणि वित्तमंत्री असताना त्यांनी भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू सचिव, नगरविकास सचिव आणि गृहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला.
माधव गोडबोलेंचा जन्म 15 ऑगस्ट 1936 रोजी झाला. अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून त्यांनी 'विकासाचे अर्थशास्त्र' या विषयात एमए आणि पीएचडी केली.

फोटो स्रोत, Getty Images
सेवानिवृत्तीनंतर माधव गोडबोलेंनी वाचन आणि लेखनावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्यातून विविध पुस्तकं मराठीजनांपर्यंत पोहोचली.
माधव गोडबोलेंचं लेखन :
- इंदिरा गांधी एक वादळी पर्व
- कलम 370
- हरवलेले सुशासन
- भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
- लोकपालाची मोहिनी
- भारताची धर्मनिरपेक्षता धोक्याच्या वळणावर
- जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व
- अपुरा डाव
- प्रशासनाचे पैलू (खंड एक आणि दोन)
- आस्वादविशेष
- फाळणीचे हत्याकांड
माधव गोडबोलेंनी दहाहून अधिक इंग्रजी आणि तितकीच मराठी पुस्तकं लिहिली. 'अपुरा डाव' हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र, मासिकांमधूनही सातत्यानं लेखन केलं.
त्यांच्या 'जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन' या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








