रणबीर कपूर-आलिया भट्ट विवाह बंधनात अडकले

रणबीर आलिया

फोटो स्रोत, Huype PR

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.

लग्नानंतर आलिया भट्टनं इन्स्टाग्रावर एक पोस्ट लिहिली आहे.

त्यात तिनं लिहिलंय, "आमचं कुटुंब आणि मित्रमंडळींच्या सहवासात, आमच्या घरी, आमच्या आवडत्या ठिकाणी - बाल्कनीमध्ये जिथं आम्ही आमच्या नात्याची शेवटची 5 वर्षे घालवली, अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही लग्न केलं.

"आमच्या या नात्यात याआधी बरंच काही घडलेलं असताना, आता आम्ही एकत्रपणे आणखी आठवणी तयार करण्यासाठी तयार आहोत.

"ज्या आठवणींमध्ये प्रेम, आनंद, आरामदायी शांतता, रात्रीचे चित्रपट बघणं, मुर्खासारखी भांडणं करणं, वाईन आणि चायनीजचा आनंद घेणं, यांचा समावेश असेल.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

"आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही आम्हाला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे."

असं पार पडलं लग्न

लग्नासाठी रणबीर आणि आलिया यांचं मुंबईतील पाली हिलस्थित वास्तू बिल्डिंगला फुलांनी सजवण्यात आलं.

रणबीरचा बंगला कृष्णा राज जिथं स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षं राहत होते, त्याचं डागडुजीचं काम सध्या सुरू आहे. पण, या बंगल्यापासून रणबीर आणि आलिया यांच्या नव्या वास्तू बंगल्यापर्यंत रोषणाई करण्यात आली.

रणबीर कपूरची वरात कृष्णा राज बंगल्यापासून वास्तूपर्यंत आणली जाईल, असं सांगितलं गेलं होतं. या दोन्ही घरांदरम्यान असलेला रस्ता एखाद्या सणासारखा सजवण्यात आला होता.

'आलिया आमच्यासाठी सर्वोत्तम भेट'

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाविषयी कपूर कुटुंबीय आधी काहीही बोलायला तयार नव्हतं. पण काल नीतू कपूर यांनी म्हटलंय की, आलिया आमच्यासाठी सर्वोत्तम भेट आहे. देव त्या दोघांना नेहमी आनंदी ठेवो.

रणबीर आलिया

रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहिनीनं म्हटलं की, आलिया खूप क्यूट मुलगी आहे. सुंदर बाहुलीसारखी आहे.

हळद लागली...

लग्नसोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. कपूर कुटुंबीयांच्या वांद्रेस्थित पाली हिल परिसरातल्या घरी पूजा झाली. या बिल्डिंगमध्ये रणबीर आठव्या मजल्यावर तर आलिया पाचव्या मजल्यावर राहते.

करिश्मा कपूर

फोटो स्रोत, Madhu pal

फोटो कॅप्शन, करिश्मा कपूर

पूजेला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. सुमारे तासभर ही पूजा चालली. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम झाला. मेहंदीनंतर हळद आणि संगीत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रणबीचे काका रणधीर कपूर यांच्या मुली करिश्मा कपूर, आणि करीना कपूर उपस्थित होत्या.

महेश भट्ट आणि पूजा भट्ट

फोटो स्रोत, Madhu pal

फोटो कॅप्शन, महेश भट्ट आणि पूजा भट्ट

याशिवाय रणबीरचे जवळचे मित्र अयान मुखर्जी, करण जोहरही उपस्थित होते. तर आलियाचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट, भाऊ राहुल भट्ट आणि मोठी बहीण पूजा भट्ट देखील उपस्थित होते.

लग्नाच्या तारखेबाबत सस्पेन्स

चित्रपट विश्वातल्या अभिनेते आणि अभिनेत्र्यांच्या लग्न तारखेबाबत नेहमीच सस्पेन्स असतो. रणवीर सिंह-दीपिका पदुकोण आणि विकी कौशल-कटरिना कैफ यांच्या लग्नावेळीही तारखेसंदर्भात सस्पेन्स पाहायला मिळाला होता.

रणबीर कपूर, आलिया भट्ट, कपूर घराणं, लग्न, सेलिब्रेटी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

काही दिवसांपूर्वी नीतू कपूर डान्स दिवाने ज्युनियर रिअलिटी डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना रणबीर-आलिया लग्नाबाबत विचारण्यात आलं. मला याविषयी माहिती नाही सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

फक्त नीतू कपूरच नव्हे तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आलियाला याबाबत विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली, लोकांनी आता ब्रेक घेतला पाहिजे. गेल्या वर्षी बॉलीवूडमध्ये दोन सुंदर जोडप्यांचं लग्न झालं आहे. आता आपण विश्रांती घ्यायला हवी, चित्रपट पाहायवा हवेत, चित्रपट करायला हवेत. बाकी गोष्टी नंतरही करता येतील.

'ब्रह्मास्त्र'पासून सुरू झालेलं प्रेम लग्नापर्यंत

चित्रपटसृष्टीत येण्याआधीच आलियाच्या मनात रणबीरविषयी प्रेम होतं. दिग्दर्शक किरण जोहर यांच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात यासंदर्भात आलिया यांनी प्रेमाचा खुलासा दिला होता. स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कॉफी विथ करण कार्यक्रमात आलिया आली होती.

या जोडीपैकी आलियानेच पहिल्यांदा रणबीर खूप आवडत असल्याचं सांगितलं होतं. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या वेळी हे प्रेम खऱ्या अर्थाने खुललं. चित्रपटाचं शूटिंग सुरू होताच प्रेम आणखी बहरलं. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं आणि त्यामुळेच ब्रह्मास्त्राची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. रणबीर-आलियाच्या या निर्णयाने फक्त प्रसारमाध्यमं नव्हे तर चाहत्यांनाही चक्रावून टाकलं आहे.

रणबीर आणि आलिया अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले आहेत. लग्नानंतरही ते एकत्र काम करताना दिसले तर चाहत्यांसाठी तो अनोखा अनुभव असेल. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशावरून या जोडीला चाहत्यांचं किती प्रेम मिळतं ते स्पष्ट होईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)