संजय राऊत: 'ईडीचे काही अधिकारी आणि भाजप नेते तुरुंगात जाणार'

संजय राऊत

फोटो स्रोत, Sharad Badhe

"ईडी भाजपचे एटीएम मशीन बनली आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली जात आहे," असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

"फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच केंद्रीय यंत्रणांच्या धाडी का पडत आहे," असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. यावेळी त्यांनी एकही प्रश्न मात्र घेतला नव्हता. आज 8 मार्च रोजी त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.

संजय राऊत काय बोलले?

  • केवळ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातच धाडी का टाकल्या जात आहे. फक्त शिवसेनेच्याच नेत्यांकडे पैसा आहे का, भाजपचे नेत्यांना इंकम नाही का ?
  • शिवसेनेतील 14 नेत्यांवर केंद्रीय यंत्रणेच्या धाडी पडल्या आहेत.
  • भाजपशी संबंधित असलेल्या नेत्यांनी जे गैरव्यवहार केले आहेत त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली आहे.
  • मुंबई पोलिसांकडे आज आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांची आणि भाजप नेत्यांची तक्रार केली आहे. महाराष्ट्र पोलीस या अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे.
  • 'ईडीचे काही अधिकारी आणि भाजप नेते तुरुंगात जाणार'
  • किरीट सोमय्या हे सिरियल कंप्लेनर आहेत. किरीट सोमय्या हे सातत्याने तक्रारी दाखल करत असतात. जसा सिरियल किलर असतो तसे ते सिरियल कंप्लेनर आहेत.
X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

15 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी किरीट सोमय्या तसंच त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आजही संजय राऊत यांनी सोमय्यावर आरोप केले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.

भाजपचे साडेतीन कोठडीत असतील असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला होता. साडेतीन नेत्यांची नावं एकेक करून कळतील, असं राऊत पत्रकार परिषद संपताना म्हणाले होते.

युवासेनेचे नेते राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर आयकर विभागानं छापा मारला आहे.

राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

राहुल कनाल

फोटो स्रोत, Facebook/Rrahul Narain Kanal

फोटो कॅप्शन, राहुल कनाल

राहुल कनाल हे सध्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी असून, मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचेही ते सदस्य आहेत.

टीम आदित्य'चा चेहरा म्हणून राहुल कनाल यांच्याकडे पाहिलं जातं.

या कारवाईवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल कनालवरील कारवाई चुकीची, हे दिल्लीचं आक्रमण आहे, यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत. महाराष्ट्राच निवडणुका होत आहेत हे समजल्यावर तसेच महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटू लागल्यावर ही करण्यात आली. याआधी उत्तप प्रदेश, हैदराबाद, पश्चिम बंगालमध्ये अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही"

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी आयकर विभागाने छापे मारले. त्यांच्या सोबत CISF ची टीमही उपस्थित होती.

यशवंत जाधव

फोटो स्रोत, @iYashwantJadhav

फोटो कॅप्शन, यशवंत जाधव

कोव्हिड काळातला भ्रष्टाचार, शेल कंपन्यांद्वारे केलेली गुंतवणूक यासाठी आयकर विभागाने ही छापेमारी केल्याचं कळतंय.

15 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)