उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदान; सोनू सूद यांची गाडी जप्त, घरीच थांबण्याचे आदेश

उत्तर प्रदेशमधील मतदार

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशमधील मतदार

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. आज संपूर्ण पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघात मतदान होत आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार भगवंत मान, पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचे भवितव्य आज पणाला लागले आहे.

उत्तर प्रदेशात आज तिसऱ्या टप्प्यातले मतदान होत आहे. या टप्प्यात 16 जिल्ह्यांमधील 59 विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. आजच्या मतदानात 627 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

पंजाबमध्ये मतदानासाठी निघालेल्या महिला मतदार

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc

फोटो कॅप्शन, पंजाबमध्ये मतदानासाठी निघालेल्या महिला मतदार

सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, फारुखाबाद, कन्नोज, कानपूर ग्रामीण, झांसी, या ठिकाणी आज मतदान होत आहे. हे जिल्हे समाजवादी पार्टीचा गड समजले जातात.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे करहल मतदारसंघातून उभे आहेत. आज त्या ठिकाणी मतदान आहे. त्यांच्याविरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उभे केले आहे.

सोनू सूद यांची गाडी जप्त; घरीच थांबण्याचे आदेश

पंजाबमध्ये मतदान सुरू असतानाच अभिनेता सोनू सूदची गाडी जप्त करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेचे मोगा जिल्हा प्रतिनिधी प्रभदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू सूद एका मतदानकेंद्रात आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं. त्यांची गाडी जप्त करण्यात आली आणि त्यांना घरीच थांबण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सोनू सूद घराबाहेर पडले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असं प्रभदीप सिंह यांनी सांगितलं.

पंजाब, सोनू सूद

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सोनू सूद

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवेळी हजारो स्थलांतरितांना घरी पोहोचवण्यासाठी सोनू यांनी वैयक्तिक प्रयत्न केले होते. बसेसमधून कायदेशीर परवान्यांसह त्यांनी हजारो स्थलांतरितांची देशभरात विविध ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली.

"मतदान केंद्रावर पैसे वाटप होत होतं, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते. अकाली दलाचे कार्यकर्ते लोकांना धमकावत होते. अनेत मतदारकेंद्रात पैसे वाटले जात होते. निवडणुका पारदर्शी व्हायला हव्यात. मी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे", असं सोनू यांनी सांगितलं.

सोनू यांची बहीण मालविका सूद मोगा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. मालविका यांचा काँग्रेसप्रवेश गेमचेंजर असल्याचं पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंह सिंधू यांनी म्हटलं होतं.

नेत्यांचं मतदारांना आवाहन

उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या मतदारांना ट्विट करत मतदान करण्याची विनंती केली आहे.

''पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं. विशेषतः तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी नक्की मतदान करावं,'' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची विनंती केली आहे.

''भीतीमुक्त, दंगलमुक्त आणि अपराधमुक्त राज्यासाठी, राष्ट्रवादाच्या विजयासाठी, 'आत्मनिर्भर आणि नव्या उत्तर प्रदेश'च्या निर्मितीसाठी तसंच प्रत्येकाच्या विकासाठी तुम्ही सर्वांनी मतदान नक्की करा. आधी मतदान, मग चहापान,'' असं योगी म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राहुल गांधी यांनी लोकांच्या बरोबर असलेल्या नेत्याला निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनीही ट्विटद्वारे मतदारांना आवाहन केलं. ''पंजाबमध्ये आज मतदान होत आहे. तुम्ही सर्वानी प्रगतीशील बदलासाठी मतदानाच्या माध्यमातून घटनात्मक अधिकाराचा वापर करता. तुमचे मित्र, कुटुंबीयांनाही मतदानासाठी घेऊन जा कारण प्रत्येक मत अमूल्य आहे,'' असं चन्नी म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)