एकनाथ खडसे म्हणतात, 'मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं मला बाजूला केलं' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, FACEBOOK
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं मला बाजूला केलं - खडसे
माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
"मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो. हा आपल्या स्पर्धेमध्ये असता कामा नये. म्हणून मला बाजूला करण्यात आलं," असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. त्यांचा निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता अशी चर्चा आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
"माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. वापरा आणि फेकून द्या असं भाजपचं धोरण आहे," अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली.
"गेल्या 70 वर्षाच्या राजकीय जीवनात खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही. खान्देशवाशीयांना असं वाटतं की, मराठवाडयाचे दोन-तीन मुख्यमंत्री झाले, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील मुख्यमंत्री झाले. पण खान्देशमधील झाले नाहीत. अन् एखादा माणूस पोहोचला तर त्याला होऊ दिले नाही," अशी खंत खडसेंनी यावेळी व्यक्त केली.
2) 'पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार'
गोवा निवडणुकीच्या निमितानं गोव्यात असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी इशारा दिल्यानंतर, राऊतांनी त्यांना उत्तर दिले आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
"सुजित पाटकर आणि तुमचा संबंध काय? उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे उद्योगधंदे मान्य करा, अन्यथा उद्या चार वाजता पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करेन," असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या इशाऱ्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, "अनेक वर्षापासून माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिलो जातोय. माझे नातेवाईक, माझा मित्र परिवार, माझे सहकारी यांना केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे त्रास दिला जातोय. पण त्याची पर्वा करत नाही. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार आहे."
संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली. या प्रकरणात ईडीने राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकलाय.
3) मला 5 कोटींची नुकसान भरपाई द्या - किरण माने
'मुलगी झाली हो'फेम अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्याचा वाद आता कोर्टाचे दार ठोठावण्यापर्यंत पोहोचला आहे. किरण मानेंनी मालिकेची निर्माती कंपनी असलेल्या पॅनारोमा एन्टरन्मेंटला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
प्रॉडक्शन हाऊसनं लेखी माफी मागण्यासह किरण मानेंनी या नोटिशीत म्हटलंय की, "महिलांनी आरोप केले आहेत, त्यांनीही माफी मागावी."

फोटो स्रोत, Facebook
तसंच, "चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकल्यामुळे सन्मानाने कामावर परत बोलवालं. कामाचं आतापर्यंत झालेलं नुकसान हे कधीही न भरून येणार असल्यामुळे 5 कोटींची नुकसान भरपाई द्यावी," अशीही मागणी किरण मानेंनी केलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
4) कोठडी बघितली की तब्येत कशी बिघडते? - दीपक केसरकर
माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना टोला लगावला आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे तुरुंगात आहेत. यादरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली. त्यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "आरोपीने कोठडी बघितल्यावर त्याची तब्येत बिघडते कशी?"

फोटो स्रोत, Facebook
"तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून कोण रुग्णालयात दाखल झाले असेल, तर त्याची उत्तरं अधिकाऱ्यांना द्यावी लागतील," असंही केसरकर म्हणाले. लोकमतनं ही बातमी दिलीय.
"मी मंत्री असताना एका प्रकरणात आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी झाली होती. त्यावेळी त्यांनी तब्येतीचे कारण देऊन रुग्णालयाचा आधार घेतला होता. पण मी तज्ञ डॉक्टरांना तिथे पाठवले, त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्याच्या तब्येतीला काही झाले नाही म्हणून पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते," अशी आठवणही केसरकरांनी सांगितली.
5) गोळीबाराच्या घटनेनंतरही ओवेसींनी सुरक्षा नाकारली
एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी झेड सुरक्षेची ऑफर नाकारली आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांना झेड सुरक्षेची ऑफर देण्यात आली होती. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"मला झेड सुरक्षा नकोय. मला तुमच्यासारखंच नागरिक समजा. माझ्यावर गोळीबार करणाऱ्यांविरोधात UAPA का लागू करण्यात आला नाही?" असा सवालही त्यांनी संसदेत विचारला.
"मला बोलण्यासाठी जगायचंय. गरीब सुरक्षित असतील तेव्हा माझंही आयुष्य सुरक्षित असेल. माझ्या गाडीवर गोळी झाडल्यानं मी घाबरणार नाही," असं ओवेसी म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








