लता मंगेशकरांच्या तब्येतीत आणखी सुधारणा

फोटो स्रोत, Getty Images
प्रसिद्ध गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तब्येतीत आणखी सुधारणा झाली असून व्हेंटीलेटर सपोर्टही आता हटवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना अजूनही ICU ठेवण्यात आलं आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये पूर्वीपेक्षा सुधारणा दिसून येत असल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोना आणि निमोनिया यांची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 21 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पहिल्या दिवसापासून लता मंगेशकर या ICU मध्येच उपचार घेत आहेत. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा पाहायला मिळत आहे.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी म्हणाले, "लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा पाहायला मिळाल्यानंतर त्यांचं व्हेंटीलेटर सपोर्टही हटवण्यात आलं आहे. पण त्या अजूनही ICU विभागातच आहेत. त्यांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात आली आहे."

फोटो स्रोत, Ani
लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवा थांबवण्यासाठी त्यांच्या आरोग्याची माहिती रुग्णालयाच्या पथकाकडून सातत्याने माध्यमांना दिली जात आहे.
गेल्या आठवड्यात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांना ऊत आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. तसंच कुटुंबीयांनीही अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही केलं होतं. आहे.
शुक्रवारी (21 जानेवारी) जारी केलेल्या पत्रकात लतादीदींच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं, "सगळ्यांना आवाहन आहे की, कुठल्याही चुकीच्या बातम्यांना थारा देऊ नका. लतादीदींवर डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम आयसीयूत उपचार करत आहे. लतादीदी लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परततील, अशी प्रार्थना करूया."

फोटो स्रोत, Getty Images
लतादीदींवर उपचार करणारे जनरल फिजीशियन डॉ. प्रतित समदानी यांनी लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बीबीसी मराठीला माहिती दिली होती.
डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितलं होतं की, "लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांना न्यूमोनिया झालाय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत."
डॉ. प्रतित समदानी आणि त्यांचं पथक लतादीदींवर उपचार करत आहेत.
अफवा न पसरवण्याचं स्मृती इराणींचं आवाहन
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
लता मंगेशकर उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. त्या लवकरच बऱ्या होऊन घरी परततील. त्यामुळे लोकांनी अफवा पसरवू नयेत, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे, असं त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








