नरेंद्र मोदी: टेलिप्रॉम्प्टरवरून काँग्रेसने उठवली टीकेची झोड

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter/@PIB_INDIA

दाव्होसमध्ये सोमवारी (17 जानेवारी) वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या, ज्यावरून आता काँग्रेसह इतर विरोधी पक्षांनी खिल्ली उडवण्यास सुरुवात केलीय.

सोमवारी, 17 जानेवारीला रात्री पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणाचा व्हीडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. या व्हीडिओनुसार, भाषणादरम्यान मोदी अचानक त्यांच्या डाव्या बाजूला वारंवार पाहतात आणि काही सेकंदांनंतर गप्प होतात व फोरमचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांना विचारतात की, माझा आणि माझ्या दुभाष्याचा आवाज नीट ऐकू येतोय का?

यानंतर मोदी आपलं भाषण पुन्हा सुरू करतात.

भाषणादरम्यान नेमक्या काय अडचणी आल्या, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली नाहीय. मात्र, सोशल मीडियावर बऱ्याच जणांकडून असा अंदाज वर्तवला जातोय की, टेलिप्रॉम्प्टरमधील तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकार घडला.

काँग्रेसनं अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत म्हटलंय की, 'हमें तो टेलिप्रॉम्प्टर ने लुटा, अपनों में कहाँ दम था'

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "एवढं खोटं तर टेलिप्रॉम्प्टरलाही झेपलं नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्वीट केलाय, ज्यात मोदींच्या दोन्ही बाजूला टेलिप्रॉम्प्टर आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय, "मेरे दो अनमोल रतन."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या अफवांची चौकशी करून सत्य पडताळणाऱ्या ऑल्टन्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांना वाटतं की, 'टेलिप्रॉम्प्टरमधील अडचणींमुळेच मोदींच्या भाषणात बाधा आली नाहीय.'

प्रतीक सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा आणखी एका स्रोताचा व्हीडिओ शेअर केला आणि ट्वीटमध्ये म्हटलंय की, "या गोष्टीची शक्यता फार कमी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात टेलिप्रॉम्प्टरमुळे बाधा आली. जर तुम्ही वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचं रेकॉर्डिंग पाहिलंत, तर तुम्हाला ऐकायला येईल की, मागून कॅमेरामागून मोदींना कुणीतरी विचारतोय की, सर तुम्ही त्यांना एकदा विचारा की, सर्व जोडले गेलेत का? हा भाग पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनेलवर स्ट्रीम करण्यात आलेल्या व्हीडिओत स्पष्ट नाही."

प्रतीक सिन्हा आणखी एका ट्वीटमध्ये म्हणतात की, "टेलिप्रॉम्प्टर साधारणत: समोर असतं. पंतप्रधानांच्या भाषणात जेव्हा अडथळा येतो, तेव्हा ते बाजूला पाहतात. तिथे कदाचित पंतप्रधान कार्यालयाकडून कुणीतरी या कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंधित व्यक्ती होती. अशात हे शक्य आहे की, तेथील कुणी व्यक्ती मोदींना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय."

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेलिप्रॉम्प्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न पाहता मोठं-मोठी भाषणं देणारे नेते म्हणून ओळख आहे. मोदी स्वातंत्र्य दिनालाही लाल किल्ल्यावरून देशाला असं संबोधतात की, जसं न पाहता बोलतायेत.

मात्र, नरेंद्र मोदी भाषणासाठी टेलिप्रॉम्प्टर वापरतात. यावरून याआधीही अनेकदा चर्चा झालीय.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

3 मार्च 2019 रोजी निववडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पटण्यातील गांधी मैदानात सभेत बोलत असताना, समोर दोन टेलिप्रॉम्प्टर लावण्यात आले होते. तेव्हा खरंतर भाषण हिंदीतून होतं आणि मोदींना हिंदी भाषा चांगली येते. मग असं काय झालं की, लोकांना हिंदी भाषेतून संबोधित करण्यासाठीही टेलिप्रॉम्प्टरची गरज लागली?

त्यावेळी माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनीही या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

लालू प्रसाद यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, "बिहारच्या महान न्यायप्रिय भूमीनं लायकी मोदींना लायकी दाखवली. योजना अयशस्वी झाल्यानं हा माणूस काहीही बडबडू शकतो आणि खोटं बोलू शकतो. खोटी आश्वासानं फेकू शकतो. बिहारमधील संभाव्य पराभवामुळे आत्मविश्वास गमावल्यानं भाषणही टेलिप्रॉम्प्टरवर पाहून करावं लागतंय."

मात्र, तेव्हा भाजपच्या प्रवक्त्यांनी मोदींनी टेलिप्रॉम्प्टर वापरल्याचा दावा फेटाळला होता. मात्र, भाषणाच्या व्हीडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की, टेलिप्रॉम्प्टर लावण्यात आलं होतं.

त्याचवेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जदयूचे प्रवक्ता अजय आलोक यांनी मात्र व्यासपीठावर टेलिप्रॉम्प्टर होते, असं म्हटलं होतं.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

पटनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर अजय आलोकही उपस्थित होते.

अजय आलोक यांनी म्हटलं होतं की, "पंतप्रधान त्यांच्या सभांमध्ये टेलिप्रॉम्प्टरचा वापर काही पहिल्यांदा करत नाहीत. बहुतेक सगळ्याच सभांमध्ये ते टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात. ते भाषणाची सुरुवात स्थानिक भाषेत करतात. पटनामध्ये भोजपुरी, मगही आणि मैथिली भाषेत त्यांनी सुरुवात केली. त्या बोली त्यांना येत नाहीत. त्यामुळे या बोलीभाषा बोलण्यासाठी ते टेलिप्रॉम्प्टरचा आधार घेतात."

मोदी टेलिप्रॉम्प्टरचा वापर परदेशी दौऱ्यातही करतात. इंग्रजीत बोलण्याची मोदी साधरणत: टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात.

काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, तथ्यांमध्ये काही चुका होऊ नयेत म्हणून मोदींनी टेलिप्रॉम्प्टरचा वापर करण्यास सुरुवात केलीय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)